नववर्षाची पार्टी करून परतणाऱ्या ६ मित्रांवर काळाचा घाला
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : नववर्षाची पार्टी साजरी करून कारने परत येणाऱ्या सहा मित्रांवर काळाने घाला घातला. कारवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव कार पहिल्यांदा दुभाजकाला धडकली त्यानंतर झाडाला धडकून उलटली. या अपघातात कारमधील ६ तरूणांचा मृत्यू झाला. ही घटना झारखंडमधील जमशेदपूर येथे घडली. अपघाताच्या वेळी ८ जण कारमध्ये होते. उपचारादरम्यान पाच जणांचा मृत्यू झाला. दोन वाचलेले गंभीर जखमी झाले आहेत.
Jharkhand: 6 people died in a road accident in Jamshedpur after their car went uncontrolled and hit the divider. A total of 8 people, all residents of Adityapur, were there in the car at the time of the accident. Five died on the spot while one died during the treatment. Two…
— ANI (@ANI) January 1, 2024
स्थानिक लोकांनी पोलिसांना या घटनेबद्दल माहिती दिली, त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह कारमधून बाहेर काढले. तर जखमींना उपचारासाठी हलवण्यात आले.
हॉटेलमध्ये नवीन वर्षाची पार्टी साजरी करून परत येताना ही घटना घडली. कारमध्ये बसलेले सर्व तरुण मद्यधुंद अवस्थेत होते, अशी माहिती मिळत आहे.
Latest Marathi News नववर्षाची पार्टी करून परतणाऱ्या ६ मित्रांवर काळाचा घाला Brought to You By : Bharat Live News Media.