‘निमंत्रण वाद’ : उद्धव ठाकरेंना राम मंदिराच्‍या मुख्‍य पुजार्‍यांचे उत्तर, “प्रभू रामाचे…”

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा सोहळा २२ जानेवारीला होत आहे. या सोहळ्याचे निमंत्रण मिळाले नसल्‍याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला होता. यावर श्री रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी ( Ram Temple chief priest ) आचार्य सत्येंद्र दास यांनी उत्तर दिले आहे. Ram Temple chief priest :  प्रभू रामाचे … The post ‘निमंत्रण वाद’ : उद्धव ठाकरेंना राम मंदिराच्‍या मुख्‍य पुजार्‍यांचे उत्तर, “प्रभू रामाचे…” appeared first on पुढारी.
‘निमंत्रण वाद’ : उद्धव ठाकरेंना राम मंदिराच्‍या मुख्‍य पुजार्‍यांचे उत्तर, “प्रभू रामाचे…”

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा सोहळा २२ जानेवारीला होत आहे. या सोहळ्याचे निमंत्रण मिळाले नसल्‍याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला होता. यावर श्री रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी
( Ram Temple chief priest ) आचार्य सत्येंद्र दास यांनी उत्तर दिले आहे.
Ram Temple chief priest :  प्रभू रामाचे भक्‍त असलेल्‍यांनाच निमंत्रण
वृत्तसंस्‍था ‘एएनआय’शी बोलताना आचार्य सत्येंद्र दास म्‍हणाले की, २२ जानेवारी रोजी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा सोहळा होत आहे. मात्र साठीचे निमंत्रण फक्‍त प्रभू रामाचे भक्‍त असलेल्‍यांनाच देण्‍यात आली आहेत. भाजप रामाच्या नावावर लढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्वत्र आदर केला जातो. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात कोणती कामे केली आहेत, असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. हे राजकारण नाही. ही त्यांची भक्ती आहे.”
संजय राऊत एकेकाळी प्रभू रामाच्या नावाने निवडणूक लढवत होते
संजय राऊत एकेकाळी प्रभू रामाच्या नावाने निवडणूक लढवत होते. आज ज्यांनी प्रभू रामावर विश्वास ठेवला तेच सत्तेत आहेत. ते कोणत्या मूर्खपणाबद्दल बोलत आहेत? प्रभू रामाचा अपमान करत आहे, असेही आचार्य सत्येंद्र दास यांनी म्‍हटले आहे.
उद्धव ठाकरेंनी निमंत्रणावरुन केली होती भाजपवर टीका
निमंत्रण पत्रिकेत चुका झाल्‍याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केलीहोती. अयोध्‍येतील राम मंदिरात होणार्‍या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यावरुन कोणी राजकारण करू नये. दघाटन कार्यक्रमाचे राजकीय कार्यक्रमात रुपांतर होता कामा नये किंवा एकाच पक्षाभोवती फिरू नये, असा टोलाही त्‍यांनी लगावला होता.

Ram Mandir chief priest expresses happiness over PM Modi’s visit to Ayodhya
Read @ANI Story | https://t.co/Y6Qkd5Ozh9#PMModi #AyodhyaRamTemple #Ayodhya #RamMandir #UttarPradesh pic.twitter.com/Xy7BoNZVHN
— ANI Digital (@ani_digital) December 30, 2023

हेही वाचा : 

राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण आल्याच्या वृत्ताला उद्धव ठाकरेंचा इन्कार
राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण आले तरी जाणार नाही : शरद पवार
Ram Mandir : नेपाळमधील जानकी मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनाही रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी निमंत्रण

 
 
Latest Marathi News ‘निमंत्रण वाद’ : उद्धव ठाकरेंना राम मंदिराच्‍या मुख्‍य पुजार्‍यांचे उत्तर, “प्रभू रामाचे…” Brought to You By : Bharat Live News Media.