जनावरांचे मृत्यू रोखण्यासाठी मोहीम
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : रेल्वे ट्रॅकवर आलेल्या अनेक जनावरांंना रेल्वेच्या बसलेल्या धडकेमुळे अनेक पाळीव जनावरे मृत्युमुखी पडतात. परिणामी, रेल्वेचा मोठा अपघात होऊन प्रवाशांचे जीवदेखील धोक्यात येण्याची शक्यता असते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून हे अपघात रोखण्यासाठी ’मिशन झिरो कॅटल रन ओव्हर ड्राईव्ह’ हाती घेण्यात येत आहे. या मिशन अंतर्गत रेल्वे अधिकारी परिसरातील गायी-म्हशींच्या मालकांचे समुपदेशन करणार आहेत. देशभरात धावत्या रेल्वेची धडक बसून हजारो गायी-म्हशींचे प्राण जातात. गेल्या अनेक वर्षांपासून अशा घटना घडत आहेत. मात्र, त्या रोखण्यात रेल्वेला अद्यापपर्यंत यश आलेले नाही. रेल्वेच्या पुणे विभागांतर्गत फक्त हे अपघात रोखण्यासाठी विशेष मोहीम घेण्यात येत आहे. या मोहिमेसाठी रेल्वेच्या पुणे विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांनी पुढाकार घेतला आहे.
…तर होणार ही कारवाई…
रेल्वेच्या आवारात किंवा रेल्वे रुळांजवळ जनावरे आढळून आल्यास किंवा त्यांचा अपघात झाल्यास रेल्वे प्रशासन प्राणीमालकांवर रेल्वे कायदा कलम 154 आणि अन्य संबंधित कलमांनुसार कारवाई करेल. अपघात व कारवाई टाळण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी पाळीव प्राण्यांना रेल्वे परिसरात सोडू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
हेही वाचा :
Nashik Leopard News : महामार्गावर बिबट्या जखमी अवस्थेत, वाहतुक खोळंबली
हॉटेल उद्योगाला श्रीराम पावले
Latest Marathi News जनावरांचे मृत्यू रोखण्यासाठी मोहीम Brought to You By : Bharat Live News Media.