‘इस्रो’ची ऐतिहासिक ‘झेप’; XPoSat चे यशस्वी प्रक्षेपण

पुढारी ऑनलाईन डेस्क : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी एक्सपोसॅट उपग्रहाच यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) नवीन वर्षात कृष्णविवरांचा अभ्यास (black holes) करण्यासाठी XPoSat मिशन लाँच केले. PSLV-C58 रॉकेटच्या माध्यमातून ‘एक्स-रे पोलारिमीटर उपग्रह मिशन’चे श्रीहरीकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे. (PSLV-C58/XPoSat Mission) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने आपल्या शिरपेचात मानाचा आणखी … The post ‘इस्रो’ची ऐतिहासिक ‘झेप’; XPoSat चे यशस्वी प्रक्षेपण appeared first on पुढारी.
‘इस्रो’ची ऐतिहासिक ‘झेप’; XPoSat चे यशस्वी प्रक्षेपण

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी एक्सपोसॅट उपग्रहाच यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) नवीन वर्षात कृष्णविवरांचा अभ्यास (black holes) करण्यासाठी XPoSat मिशन लाँच केले. PSLV-C58 रॉकेटच्या माध्यमातून ‘एक्स-रे पोलारिमीटर उपग्रह मिशन’चे श्रीहरीकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे. (PSLV-C58/XPoSat Mission)
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने आपल्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला आहे. भारत आपले पहिले ‘एक्स-रे पोलारिमीटर उपग्रह’ हे ध्रुवीय मिशन सुरू करणार आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून आज सकाळी ९.१० वाजता PSLV-C58 चे प्रक्षेपण झाले. यामध्ये पीएसएलव्ही सी ५८ सह एक्स-रे पोलरीमेट्री सॅटेलाईट (एक्स्पो सॅट) पाठवण्यात आले आहे.  हा उपग्रह कृष्णविवर आणि न्यूट्रॉन ताऱ्यांचा अभ्यास करेल. (PSLV-C58/XPoSat Mission)

#WATCH | PSLV-C58 XPoSat Mission launch | ISRO launches X-Ray Polarimeter Satellite (XPoSat) from the first launch-pad, SDSC-SHAR, Sriharikota in Andhra Pradesh.
(Source: ISRO) pic.twitter.com/ua96eSPIcJ
— ANI (@ANI) January 1, 2024

#WATCH | PSLV-C58 XPoSat Mission launch | The launch of the X-Ray Polarimeter Satellite (XPoSat) is set for today at 09:10 am from the first launch-pad, SDSC-SHAR, Sriharikota in Andhra Pradesh.
(Visuals from Satish Dhawan Space Centre, Source: ISRO) pic.twitter.com/fEbi2AgvYt
— ANI (@ANI) January 1, 2024

PSLV-C58/XPoSat Mission: जगातील दुसरे ध्रुवीय मिशन
एक्स्पो सॅट ही आदित्य एल १ आणि ॲस्ट्रो सेंटनंतर अंतराळात स्थापन होणारी तिसरी वेधशाळा असेल. २०२१ मध्ये लाँच केलेल्या ‘नासा’च्या इमेजिंग एक्स-रे पोलरीमेट्री एक्सप्लोररनंतर हे भारताचे पहिले आणि जगातील दुसरे ध्रुवीय मिशन आहे, असे ‘इस्रो’ने म्हटले आहे.
तेजस्वी ताऱ्यांचा अभ्यास करणार
या मोहिमेचे उद्दिष्ट विश्वातील ५० तेजस्वी स्रोतांचा अभ्यास करणे असा आहे. यामध्ये पल्सर, ब्लॅक होल एक्स-रे बायनरी, सक्रिय गॅलेक्टिक न्यूक्ली, न्यूट्रॉन तारे आणि थर्मल नसलेल्या सुपरनोव्हाचे अवशेष समाविष्ट आहेत. हा उपग्रह ५००-७०० कि.मी.च्या कमी पृथ्वीच्या कक्षेत स्थापित केला जाईल. तो ५ वर्षे विविध स्वरूपाची माहिती गोळा करेल. हा उपग्रह व त्याचा पेलोड यूआर राव उपग्रह आणि रमण संशोधन संस्थेने तयार केला आहे. याव्दारे अंतराळातील दूरच्या स्रोतांची भूमिती आणि यंत्रणा यांची माहिती जमा करणे शक्य होणार आहे.
हेही वाचा:

ISRO Review in Year 2023 : चांद्रयान ३, गगनयान, आदित्य एल १ – इस्रोची ऐतिहासिक कामगिरी
‘Manohar Parrikar Young Scientist Award’: इस्रोच्या डॉ. मथवराज एस. यांना ‘मनोहर पर्रीकर युवा वैज्ञानिक पुरस्कार’ प्रदान
2040 पर्यंत चंद्रावर मानव पाठविणार : इस्रो प्रमुख सोमनाथ

Latest Marathi News ‘इस्रो’ची ऐतिहासिक ‘झेप’; XPoSat चे यशस्वी प्रक्षेपण Brought to You By : Bharat Live News Media.