वजन कमी करायचे आहे? नववर्षात ‘हे’ संकल्प कराच

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या काही वर्षांचा आढावा घेतल्यास आपल्या लक्षात येईल की, वाढता लठ्ठपणा, उच्च साखर आणि उच्च रक्तदाब यासांरखे आजार लोकांसाठी मोठी समस्या बनत आहे. सरत्या वर्षाला निरोप देत असताना बरेचजण नविन वर्षाच्या पहिल्या दिवशी संकल्प करणार असतील की, काहीही करुन आपण वजन कमी करायचं, पण सुरुवातीचे काही दिवस हा संकल्प आपल्या कामातून हद्दपार … The post वजन कमी करायचे आहे? नववर्षात ‘हे’ संकल्प कराच appeared first on पुढारी.
वजन कमी करायचे आहे? नववर्षात ‘हे’ संकल्प कराच

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : गेल्या काही वर्षांचा आढावा घेतल्यास आपल्या लक्षात येईल की, वाढता लठ्ठपणा, उच्च साखर आणि उच्च रक्तदाब यासांरखे आजार लोकांसाठी मोठी समस्या बनत आहे. सरत्या वर्षाला निरोप देत असताना बरेचजण नविन वर्षाच्या पहिल्या दिवशी संकल्प करणार असतील की, काहीही करुन आपण वजन कमी करायचं, पण सुरुवातीचे काही दिवस हा संकल्प आपल्या कामातून हद्दपार होतो. जर तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत जेवणाबाबत  दोन गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही खूप  लवकर फायदा होऊ शकतो. जर तुम्ही नवीन वर्ष  २०२४ मध्ये वजन कमी करण्याचा विचार केला असेल, तर १ जानेवारीपासूनच या दोन टिप्स नक्की फॉलो करा. (New Year Weight Loss Plan)
New Year Weight Loss Plan
New Year Weight Loss Plan : भूकेपैकी फक्त ७५% खाण्याचा प्रयत्न करा
अनेकदा लोक त्यांच्या आहाराचे योग्य नियोजन करत नाहीत. ते चांगला आहार घेतात पण गरजेपेक्षा जास्त खातात. लोकांना मनाला समाधान मिळेपर्यंत खाण्याची सवय असते. तर पोटाप्रमाणे खावे. तज्ज्ञांच्या मते, तुम्ही अर्ध्या पोटीच खावे. पोट कधीही पूर्ण भरू नका. आपल्या भूकेपैकी फक्त ७५% खाण्याचा प्रयत्न करा. यामुळे पचनसंस्थेवर ताण पडत नाही आणि तुमचे वजनही वाढत नाही. तसेच, शरीरासाठी आवश्यक ते मिळते.
सूर्यास्तानंतर खाऊ नका
सूर्यास्तानंतर काहीही खाऊ नये असे अनेक डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे.  वैज्ञानिकदृष्ट्या संध्याकाळनंतर निसर्गासोबतच आपले शरीरही निवांत अवस्थेत येते. संध्याकाळनंतर, पचनसंस्था देखील विश्रांतीच्या स्थितीत जाऊ लागते. त्यामुळे या वेळी जे काही खातो ते पचत नाही. संध्याकाळनंतर काहीही न खाण्याचा नियम अंगीकारला तर तुम्हाला स्वतःलाच फरक दिसू लागेल.
नविन वर्षांपासून आपल्या भूकेपेक्षा ७५% खाण्यास प्राधान्य दिल्यास आणि सूर्यास्ता अगोदर जेवन केल्यास जर येत्या काही दिवसात तुमचे वजन कमी  होत आहे हे तुमच्या लक्षात येईल. मग करताय ना हे दोन बदल तुमच्या जेवनात.
 
हेही वाचा : 

वजन कमी करायचंय! मग ‘हे’ सोपे व्यायामप्रकार करा
वजन कमी होत नसेल तर केमिकल लोचा!
Chinese influencer dies : वजन कमी करून इन्स्पायरच्या नादात चीनमधील सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने गमवला जीव
वजन कमी करताय? ‘नॉन-शुगर स्‍वीटनर’ पासून लांब राहा
Walking for Weight Loss : वजन कमी करण्‍यासाठी दररोज नेमकं किती पावले चालावे? जाणून घ्‍या नवीन संशोधनातील माहिती
वजन कमी, जास्त करण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा

Latest Marathi News वजन कमी करायचे आहे? नववर्षात ‘हे’ संकल्प कराच Brought to You By : Bharat Live News Media.