आता भारत थांबणार नाही : पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : ‘विकसित भारत’ बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून आज देश त्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. आत्मनिर्भरतेच्या भावनेने आणि प्रेरणेने देश ओसंडून गेला आहे. हाच उत्साह आणि भावना 2024 मध्येही कायम ठेवायची आहे. कारण भारत आता थांबणार नाही, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिली.
‘मन की बात’ या रेडिओ शृंखलेतील वर्षातील शेवटच्या आणि एकूण 108 व्या भागात ते बोलत होते. पंतप्रधानांनी देशवासीयांना नवीन वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या. ते म्हणाले की, आज भारत जगातचा इनोव्हेशन हब बनला आहे. इनोव्हेशन इंडेक्समध्ये 2015 मध्ये भारत 81 व्या स्थानी होता. आज 40 व्या स्थानावर भारताने झेप घेतली आहे.
भारत आता थांबणार नाही. आज देश ‘विकसित भारत’ आणि आत्मनिर्भरतेच्या भावनेने ओतप्रोत उत्साहाने मार्गक्रमण करीत आहे. ज्या गतीने आणि उत्साहाने आपण आतापर्यंत काम केले तोच उत्साह, तोच वेग 2024 मध्येही कायम ठेवायचा आहे. यावेळी मोदी यांनी चांद्रयान मोहिमेच्या यशासह 2023 मध्ये विविध क्षेत्रांत देशाने मिळवलेल्या यशाचा आवर्जून उल्लेख केला.
Latest Marathi News आता भारत थांबणार नाही : पंतप्रधान मोदी Brought to You By : Bharat Live News Media.