मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक रेव्ह पार्ट्या : विजय वडेट्टीवार
नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा: अंमली पदार्थ, ड्रग्जमुळे प्रगतिशील, पुरोगामी राज्य बुडत चालले आहे. महाराष्ट्रात कायदा – सुव्यवस्था बिघडली आहे. गुटखा तंबाखू उघडपणे विकला जात आहे. रेव्ह पार्टी खुलेआम सुरू आहे. त्याकडे सरकारचे लक्ष नाही, असा आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. Vijay Wadettiwar
वडेट्टीवार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पकड मुख्यमंत्री असताना जी होती, ती पकड उपमुख्यमंत्री झाल्यापासून सुटत चालली आहे. राज्यात सर्रास रेव्ह पार्टी सुरू आहे. मुख्यमंत्री यांच्या ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक रेव्ह पार्टी होत आहेत. एकंदरीत महाराष्ट्रातील राजकारणात चुल्लुभर पाण्यात डूब मारण्याची वेळ आली आहे. ती आता खरी होताना दिसून येत आहे. Vijay Wadettiwar
भारत देश म्हणजे फक्त गुजरात नाही. एकेकाळी उद्योग क्षेत्रात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राला गुंतवणूकदारांनी पसंती दिली होती. आता आपला प्राधान्यक्रम हा महाराष्ट्राचा आठव्या व नवव्या स्थानावर जाऊन पोहोचला आहे. उद्योग झपाट्याने पळवले जात आहेत, असा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केला.
हेही वाचा
नागपूर : शिंदे गट १०० टक्के भाजपमध्ये विलीन होणार: विजय वडेट्टीवार
फुटीर गटामध्ये लढण्याची क्षमता नाही; विजय वडेट्टीवार यांची टीका
Chandrapur News: विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे नेतृत्वात वन्य प्राण्यांच्या हल्ल्याविरोधी काँग्रेसचा मोर्चा
Latest Marathi News मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक रेव्ह पार्ट्या : विजय वडेट्टीवार Brought to You By : Bharat Live News Media.