ठाणे: कल्याण एसटी आगाराचे विठ्ठलवाडी आगारात स्थलांतर

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा:  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कल्याणमधील जुन्या एसटी आगारामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत विकासकामे सुरू असल्याने एसटी महामंडळासह प्रवाशांना मोठा अडथळा निर्माण झाला आहे. विकास कामात अडथळा येऊ नये आणि प्रवाशांची गैरसोय होऊ नये, याकरिता महामंडळाने कल्याणच्या एसटी आगाराचे विठ्ठलवाडी एसटी आगारात स्थलांतर केले आहे. Thane News कल्याणच्या एसटी आगाराचा स्मार्ट सिटी … The post ठाणे: कल्याण एसटी आगाराचे विठ्ठलवाडी आगारात स्थलांतर appeared first on पुढारी.

ठाणे: कल्याण एसटी आगाराचे विठ्ठलवाडी आगारात स्थलांतर

डोंबिवली : Bharat Live News Media वृत्तसेवा:  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कल्याणमधील जुन्या एसटी आगारामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत विकासकामे सुरू असल्याने एसटी महामंडळासह प्रवाशांना मोठा अडथळा निर्माण झाला आहे. विकास कामात अडथळा येऊ नये आणि प्रवाशांची गैरसोय होऊ नये, याकरिता महामंडळाने कल्याणच्या एसटी आगाराचे विठ्ठलवाडी एसटी आगारात स्थलांतर केले आहे. Thane News
कल्याणच्या एसटी आगाराचा स्मार्ट सिटी अंतर्गत कायापालट होणार आहे. या आगारात विकासकामे सुरू असल्याने एसटी महामंडळासह प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. यासर्व बाबींचा विचार करून पुढील एक ते दोन वर्षांच्या कालावधीसाठी विठ्ठलवाडी एसटी आगारात कल्याणचे एसटी आगार स्थलांतरित करण्यात आले आहे. कल्याण एसटी आगाराच्या लांब पल्ल्याच्या गाड्या आता विठ्ठलवाडी एसटी आगारातून सोडण्यात येत आहेत. Thane News
विठ्ठलवाडी एसटी आगाराच्या बाहेरील बाजूस कल्याण एसटी आगाराचे वर्कशॉप बनविण्यात आले आहे. सर्व एसटी गाड्या याच आगारातून रवाना केल्या जात आहेत. त्यात पुणे, नाशिक, अहमदनगर, कोकण, खानदेश, आदी भागात जाणाऱ्या मध्यम व लांब पल्ल्याच्या 35 गाड्यांचा समावेश आहे. मुरबाड, भिवंडी व इतर जवळपासच्या भागात जाणाऱ्या लोकल बसगाड्या कल्याणहून मार्गक्रमण केल्या जात असून जुन्या एसटी आगार परिसरातून प्रवासी घेऊन पुढे जातात. तर कल्याणमधील प्रवाशांकरिता जुन्या एसटी आगाराच्या मागील बाजूस असलेल्या बॅडमिंटन कोर्टवर तात्पुरते बस स्थानक बनविण्यात आले असल्याची माहिती कल्याणचे एसटी आगार व्यवस्थापक महेश भोये यांनी दिली.

हेही वाचा 
 

ठाणे : पतीने केली पत्नीसह दोघा चिमुकल्यांचा खून; ठाण्यातील कासारवडवली येथील घटना
ठाणे : प्रेयसीला कारने चिरडण्‍याचा प्रयत्‍न, ‘एसआयटी’ चाैकशी हाेणार
ठाणे: कल्याण येथून विद्यार्थ्याचे अपहरण करणारे दोघे जेरबंद

Latest Marathi News ठाणे: कल्याण एसटी आगाराचे विठ्ठलवाडी आगारात स्थलांतर Brought to You By : Bharat Live News Media.