‘लाल सिंह चड्ढा’ नंतर आमिरचा बिग प्रोजेक्ट?; रोज करतोय ‘हे’ काम

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता आमिर खानला ( Aamir Khan ) ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळकले जाते. आमिरने ‘दंगल’, ‘3 इडियट्स’, ‘गजनी’ यासारख्या अनेक चित्रपटात दमदार भूमिका साकारल्यात. ‘दंगल’ चित्रपटातील महावीर सिंग असो वा ‘गजनी’ तील संजय सिंघानिया असो प्रत्येक भूमिकाला चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं. यानंतरचा आमिरचा ‘लाल सिंह चड्ढा’ मात्र, फ्लॉप झाला आणि तो … The post ‘लाल सिंह चड्ढा’ नंतर आमिरचा बिग प्रोजेक्ट?; रोज करतोय ‘हे’ काम appeared first on पुढारी.
‘लाल सिंह चड्ढा’ नंतर आमिरचा बिग प्रोजेक्ट?; रोज करतोय ‘हे’ काम

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता आमिर खानला ( Aamir Khan ) ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळकले जाते. आमिरने ‘दंगल’, ‘3 इडियट्स’, ‘गजनी’ यासारख्या अनेक चित्रपटात दमदार भूमिका साकारल्यात. ‘दंगल’ चित्रपटातील महावीर सिंग असो वा ‘गजनी’ तील संजय सिंघानिया असो प्रत्येक भूमिकाला चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं. यानंतरचा आमिरचा ‘लाल सिंह चड्ढा’ मात्र, फ्लॉप झाला आणि तो काही काळ अभिनयापासून दूर राहिला. दरम्यान सध्या आमिर आगामी प्रोजेक्टसाठी तयारी करत असल्याची मोठी हिंट मिळाली आहे. यासाठी तो दररोज सरावही करत असल्याची माहिती समोर आली आहे.
संबंधित बातम्या 

विजयच्या ‘Thalapathy 68’ चा पहिला लूक; विजयकांत यांच्या निधनामुळे येणार पुढील वर्षात
Aamir Khan : आमिरने घेतला मोठा निर्णय; ‘या’ कारणामुळे सोडली कर्मभूमी मुंबई
Aamir Khan : आमिर खानच्या घरी लवकरच सनई चौघडे वाजणार

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता आमिर खान ( Aamir Khan ) सध्या शास्त्रीय संगीत शिकत असून तो दररोज यासाठी मेहनत घेत आहे. शास्त्रीय संगीताचे शिक्षक त्याला रोज एक तास सराव करायला लावत असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र एकिकडे, आमिर खरोखरंच आगामी मोठ्या प्रोजेक्टची तयारी करत आहे की नाही?, किंवा आमिर एक छंद म्हणून शास्त्रीय संगीत शिकत आहे का? याबाबतची कोणतीच अधिकृत्त माहिती अद्याप समोर आलेली नाही.
तर दुसरीकडे मिळालेल्या माहितीनुसार, गुलशन कुमार यांच्या बायोपिक ‘मोगुल’ चित्रपटाशी त्याचा संबंध असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान खरी माहिती आगामी कालात समजणार आहे.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, आमिर खान ‘लाहोर 1947’ या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता सनी देओलची मुख्य भूमिका आहे. राजकुमार संतोषी यांच्या दिग्दर्शनाखाली असलेल्या या चित्रपटात आमिरचा कॅमिओ रोल असल्याची शक्यता आहे. मात्र याबाबतही कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
पर्सनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर, आमिर मुलगी इरा खानच्या लग्नाच्या तयारीत बिझी आहे. येत्या ३ जानेवारीला बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत इरा लग्न बंधनात अडकणार आहे. हे लग्न सोहळा मराठी रितीरिवाजानुसार होणार असून फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र सहभागी होणार आहेत. लग्नानंतर ६ जानेवारीला दिल्ली आणि जयपुरमध्ये भव्य रिसेप्शनही होणार आहे.

 

View this post on Instagram

 
A post shared by Aamir Khan (@amirkhanactor_)

 

View this post on Instagram

 
A post shared by Aamir Khan (@amirkhanactor_)

Latest Marathi News ‘लाल सिंह चड्ढा’ नंतर आमिरचा बिग प्रोजेक्ट?; रोज करतोय ‘हे’ काम Brought to You By : Bharat Live News Media.