गडचिरोली : शेतातील वीज तारांना स्पर्श झाल्याने हत्तीचा मृत्यू
गडचिरोली; Bharat Live News Media वृत्तसेवा : शेतातील जीवंत वीज तारांचा स्पर्श झाल्याने एका रानटी हत्तीचा मृत्यू झाला. ही घटना आज (दि.३१) पहाटे पाच वाजताच्या सुमारास कुरखेडा तालुक्यातील वाढोणा गावाजवळ घडली.
सध्या रानटी हत्तींनी आरमोरी तालुक्यात उच्छाद मांडला आहे. तीन दिवसांपूर्वी या तालुक्यातील पाथरगोटा येथील काही घरांची मोडतोड केल्यानंतर शुक्रवारी २९ डिसेंबरच्या रात्री शंकरनगर येथील एका वृद्धेला हत्तीने ठार केले. त्यानंतर २० ते २२ हत्तींचा हा कळप कुरखेडा तालुक्यात गेला. अशातच वाढोणा गावाजवळ रघुनाथ नारनवरे या शेतकऱ्याने आपल्या शेतात वन्यप्राण्यांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी वीज प्रवाह सोडला होता. त्या वीज तारांना स्पर्श झाल्याने आज पहाटे एका हत्तीचा मृत्यू झाला. वनविभागाने लावलेल्या ड्रोन कॅमेऱ्यात हे दृश्य दिसल्यानंतर सकाळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. मृत हत्ती मादी असून, ती १८ ते २० वर्ष वयाची असावी, असा अंदाज आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचे वडसा वनविभागाचे सहायक वनसंरक्षक मनेाज चव्हाण यांनी सांगितले.
हेही वाचा :
पती, मुलगा आणि सुनेदेखत रानटी हत्तीने घेतला महिलेचा जीव
नागपुरात कोरोना जेएन-वनचे ११ रुग्ण; आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली
भंडारा: वाळू तस्करांवर पहिल्यांदाच ‘एमपीएडी’अंतर्गत कारवाई; वाळू माफियांचे धाबे दणाणले
Latest Marathi News गडचिरोली : शेतातील वीज तारांना स्पर्श झाल्याने हत्तीचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.