पुणे : ठेकेदाराकडे लाच मागणारा पालिकेचा शिपाई जाळ्यात

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मृत जनावरे उचलण्याचा करार संपल्यानंतर ठेव असलेली रक्कम परत दिल्याच्या मोबदल्यात वरिष्ठांसाठी तडजोडीअंती 20 हजार रुपयांची लाच मागणार्‍या मनपाच्या शिपायावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शिपायाचे नाव इर्शाद आहे. तो महापालिकेच्या आरोग्य भवन येथे नोकरीला आहे. याप्रकरणी एका 36 वर्षांच्या व्यावसायिकाने तक्रार केली आहे. तक्रारदार यांना महापालिका हद्दीतील मृत … The post पुणे : ठेकेदाराकडे लाच मागणारा पालिकेचा शिपाई जाळ्यात appeared first on पुढारी.

पुणे : ठेकेदाराकडे लाच मागणारा पालिकेचा शिपाई जाळ्यात

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : मृत जनावरे उचलण्याचा करार संपल्यानंतर ठेव असलेली रक्कम परत दिल्याच्या मोबदल्यात वरिष्ठांसाठी तडजोडीअंती 20 हजार रुपयांची लाच मागणार्‍या मनपाच्या शिपायावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शिपायाचे नाव इर्शाद आहे. तो महापालिकेच्या आरोग्य भवन येथे नोकरीला आहे. याप्रकरणी एका 36 वर्षांच्या व्यावसायिकाने तक्रार केली आहे. तक्रारदार यांना महापालिका हद्दीतील मृत जनावरे उचलण्याचा ठेका मिळाला होता. या कराराची मुदत संपली. त्यानंतर महापालिकेकडे ठेव असलेली सुमारे साडेपाच लाख रुपयांची रक्कम परत मिळण्यासाठी तक्रारदार प्रयत्न करीत होते.
त्यातील निम्मी रक्कम परत मिळाली होती. उर्वरित रक्कम परत मिळण्यासाठी इर्शाद याने वरिष्ठांना पैसे द्यावे लागतील, असे सांगितले. त्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली. तक्रारीची पडताळणी 20 नोव्हेंबर रोजी करण्यात आली. त्यात इर्शादने त्याच्या वरिष्ठांसाठी तडजोडीअंती 20 हजार रुपयांची मागणी केली. दरम्यान, तक्रारदार यांना उर्वरित रक्कम परत मिळाली.
त्यामुळे तक्रारदार यांनी माघार घेतली. परंतु, लाचेची मागणी झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेची मागणी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीराम शिंदे, अंमलदार प्रवीण तावरे, कदम यांनी ही कारवाई केली. पोलिस निरीक्षक रूपेश जाधव तपास करीत आहेत.
हेही वाचा

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गडकोट सज्ज : पोलिस बंदोबस्त तैनात
रत्नागिरी : गोळप घरफोडी प्रकरणी सराईत गुन्हेगाराला अटक
Pune News : अल्पवयीन मुलीशी लग्न करणे पडले महागात

Latest Marathi News पुणे : ठेकेदाराकडे लाच मागणारा पालिकेचा शिपाई जाळ्यात Brought to You By : Bharat Live News Media.