रत्नागिरी : गोळप घरफोडी प्रकरणी सराईत गुन्हेगाराला अटक

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा : दोन दिवसांपूर्वी गोळप, संजिवनी नगर येथील 3 लाख 37 हजार 500 रुपयांची घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने 12 तासांच्या आत मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून चोरीचा काही मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे. जलील अब्दुल्ला सोलकर ( ६१ वर्षे, रा. कर्ला मोठया मशिदीजवळ, ता. रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे … The post रत्नागिरी : गोळप घरफोडी प्रकरणी सराईत गुन्हेगाराला अटक appeared first on पुढारी.

रत्नागिरी : गोळप घरफोडी प्रकरणी सराईत गुन्हेगाराला अटक

रत्नागिरी : Bharat Live News Media वृत्तसेवा : दोन दिवसांपूर्वी गोळप, संजिवनी नगर येथील 3 लाख 37 हजार 500 रुपयांची घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने 12 तासांच्या आत मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून चोरीचा काही मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे. जलील अब्दुल्ला सोलकर ( ६१ वर्षे, रा. कर्ला मोठया मशिदीजवळ, ता. रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
याप्रकरणी तपास करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी तात्काळ एक पथक तयार करुन पथकाला गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सुचना दिल्या. पथकाकडून अज्ञात आरोपीचा शोध सुरु होता. या पथकाने विविध ठिकाणची सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याआधारे हा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार जलील सोलकर याने केल्याचे निष्पन्न केले. त्यावरुन आरोपीला 12 तासाच्या आत अटक करुन त्याच्या कडून गुन्हयात चोरीस गेलेले 2 लाख 43 हजार रुपये किमंतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्यात आलेले आहेत. आरोपी जलील अब्दुल्ला सोलकर हा रत्नागिरी शहरामधील रेकॉर्डवरील स­हाईत गुन्हेगार असून त्याच्यावर घरफोडी व चोरीचे एकूण 24 गुन्हे दाखल आहेत. गुन्हयाचा पुढील तपास पुर्णगड सागरी पोलीस ठाण्यामार्फत सुरु आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक, अमोल गोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष भागणे,विजय आंबेकर,सागर साळवी, योगेश नार्वेकर, दिपराज पाटील, महिला हेड कॉन्स्टेबल वैष्णवी यादव, पोलीस नाईक दत्तात्रय कांबळे यांनी केली.
हेही वाचा 

Manoj Jarange-Patil : आरक्षण मिळेपर्यंत मुंबई सोडायची नाही, हाच नवीन वर्षाचा संकल्प : जरांगे- पाटील
‘त्‍या’ भयंकर रात्रीला वर्ष झालं! ऋषभ पंत पुनरागमनासाठी सज्ज; दिल्ली कॅपिटल्सने शेअर केला भावनिक व्हिडिओ
Rajasthan Cabinet Expansion : अखेर राजस्‍थान मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, २२ मंत्र्यांनी घेतली शपथ

 
 
Latest Marathi News रत्नागिरी : गोळप घरफोडी प्रकरणी सराईत गुन्हेगाराला अटक Brought to You By : Bharat Live News Media.