पुणे : अल्पवयीन मुलीशी लग्न करणे पडले महागात
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : अल्पवयीन मुलीशी लग्न करून जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिला दीड वर्षांचा मुलगा असून, ती दुसर्यांदा 14 आठवड्यांची गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी 17 वर्षे 11 महिने वयाच्या पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून नवर्यासह अन्य चार नातेवाइकांविरोधात येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित तरुणी सध्या 17 वर्षे 11 महिन्यांची आहे. तिचा येरवडा येथील 33 वर्षीय तरुणासोबत विवाह झाला होता. आरोपी पतीला ती अल्पवयीन असल्याचे माहिती असताना देखील, त्याने जबरदस्तीने तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिला एक दीड वर्षांचा मुलगादेखील आहे. यानंतर संबंधित युवती पुन्हा 14 आठवड्यांची गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. अल्पवयीन पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून पती, मावस बहीण, सासू, दीर आणि नणंद अशा पाच जणांविरुद्ध पोक्सोसह बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक कुलकर्णी या करत आहेत.
हेही वाचा
नववर्ष स्वागताला शहरवासीय निघाले पर्यटनाला
बाटल्यांचा वापर करून बनवले घर!
विद्यार्थ्याने बनवला जनावरांना शेतापासून दूर ठेवणारा अलार्म
Latest Marathi News पुणे : अल्पवयीन मुलीशी लग्न करणे पडले महागात Brought to You By : Bharat Live News Media.