बिहारमध्ये चक्क घर उचलून नेले दुसरीकडे!
पाटणा : हल्ली काही कारणांसाठी झाड किंवा इमारत पाडावी लागणार असेल तर ती दुसरीकडे हलवण्याचेही तंत्र विकसित झालेले आहे. आपल्या देशातही अशा तंत्राने इमारत हलवल्याची उदाहरणे आहेत. मात्र, बिहारमधील एक व्हिडीओ थक्क करणाराच आहे. या व्हिडीओमध्ये एक दुमजली घर चक्क क्रेनच्या सहाय्याने हलवले जात असताना दिसते!
एक्स या सोशल मीडियावर म्हणजेच ट्विटरवर याबाबतचा व्हिडीओ शेअर केलेला असून तो सध्या व्हायरल होत आहे. नेटकर्यांनी या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. 22 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. एखादी इमारत दुसरीकडे नेण्यासाठी त्याखाली काही विशेष यंत्रणा करून ती हळूहळू हलवली जाते. मात्र, इथे चक्क क्रेनला ही इमारत बांधून ती उचलून दुसरीकडे नेली जात असल्याचे दिसते! अनेकांना हा काय प्रकार आहे हे समजले नाही. काहींना हे घर खोटे असावे असेही वाटले.
Latest Marathi News बिहारमध्ये चक्क घर उचलून नेले दुसरीकडे! Brought to You By : Bharat Live News Media.