शिवाजी रस्ता वाहतूक बदल; श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात भाविकांची गर्दी
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : नववर्षाच्या पहिल्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने सोमवारी (1 जानेवारी) मध्यभागातील वाहतूकव्यवस्थेत मोठे बदल करण्यात येणार आहेत. शिवाजी रस्ता वाहनांसाठी बंद करण्यात येणार आहे. शिवाजी रस्त्यावरून स्वारगेटकडे जाणार्या वाहनचालकांनी जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखाना, खंडोजीबाबा चौकमार्गे टिळक रस्त्याने स्वारगेटकडे जावे. जंगली महाराज रस्त्यावरील स. गो. बर्वे चौकातून (मॉडर्न कॅफे चौक) महापालिका भवनकडे जाणारा मार्ग वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
वाहनचालकांनी जंगली महाराज रस्ता, झाशीची राणी चौक, महापालिका भवनमार्गे इच्छितस्थळी जावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे. अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे (हुतात्मा चौक) जाणारा मार्ग बंद करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी बाजीराव रस्त्याने इच्छितस्थळी जावे. शिवाजी रस्त्यावरील जिजामाता चौकातून गणेश रस्त्यावरून दारूवाला पुलाकडे जाण्यास मनाई करण्यात आली आहे. वाहनचालकांनी गाडगीळ पुतळामार्गे, कुंभारवेस चौक, पवळे चौक, साततोटी चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. गणेश रस्त्याने जिजामाता चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे.
हेही वाचा
थर्टी फस्ट : कायदा व सुव्यवस्थेसाठी चार हजार पोलिसांचा फौजफाटा
मागोवा 2023 : राजकीय उलथापालथीचे पडसाद
पार्कर सोलर प्रोब नव्या वर्षात करणार वेगाचा विक्रम
Latest Marathi News शिवाजी रस्ता वाहतूक बदल; श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात भाविकांची गर्दी Brought to You By : Bharat Live News Media.