रायगड जिल्ह्यातील २८ धरणात सरासरी ८८.३५ पाणीसाठा उपलब्ध
रायगड, पुढारी वृत्तसेवा : रायगड जिल्ह्यात २८ धरणात सरासरी ८८.३५ पाणीसाठा उपलब्ध असून हा पाणीसाठा गेल्या वर्षापेक्षा मात्र दोन टक्क्याने कमी असल्याचे दिसून येते. गेल्या वर्षी याच तारखेला २०२२ मध्ये सरासरी ९०.७८ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. २०२२ मध्ये सरासरी ९०.७८ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. रायगड जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने जिल्ह्यातील रायगड पाटबंधारे विभाग कोलाड अंतर्गत येत असलेल्या २८ धरण पैकी २५ धरण क्षेत्रात समाधानकारक पाणी साठा उपलब्ध आहे. रायगड जिल्ह्यात अद्याप ५ धरण क्षेत्रात शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तर १८ धरण क्षेत्रात ८० टक्के पेक्षा जास्त पाणीसाठा उपलब्ध आहे.
रायगड जिल्ह्यातील कमी साठा असलेला धरण क्षेत्रामध्ये श्रीवर्धन तालुक्यातील रानीवली धरण क्षेत्रात सर्वात कमी ५८ पाणीसाठा उपलब्ध आहे. यासह श्रीवर्धन तालुक्यातील कार्ले धरण क्षेत्रात ७० टक्के, उरण तालुक्यातील पुनाडे धरण क्षेत्रात ६० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. रायगड जिल्ह्यात पाटबंधारे विभाग कोलाड अंतर्गत २८ धोरण येत असून या धरणात प्रामुख्याने मुरुड तालुक्यातील फणसाड धरण क्षेत्रात ९६ टक्के पाणीसाठा उपलब्ध, तळा तालुक्यातील वावा धरण क्षेत्रात ९४ टक्के पाणीसाठा उपलब्ध, रोहा तालुक्यातील सुतारवाडी धरण क्षेत्रात ९७ टक्के पाणीसाठा उपलब्ध, पेण तालुक्यातील आंबेघर धरण क्षेत्रात ८७ टक्के पाणीसाठा उपलब्ध, अलिबाग तालुक्यातील श्रीगाव धरण क्षेत्रात ९० टक्के पाणीसाठा उपलब्ध, सुधागड तालुक्यातील कोंडगाव धरण क्षेत्रात ८६ टक्के पाणीसाठा उपलब्ध, घोटवडे धरण क्षेत्रात ८४ टक्के पाणीसाठा उपलब्ध, ढोकशेत धरण क्षेत्रात ८२ टक्के पाणीसाठा उपलब्ध, कवेळे धरण क्षेत्रात ७६ टक्के पाणीसाठा उपलब्ध, उन्हेरे धरण क्षेत्रात ८० टक्के पाणीसाठा उपलब्ध, श्रीवर्धन तालुक्यातील कार्ले धरण क्षेत्रात ७० टक्के पाणीसाठा उपलब्ध, कुडकी धरण क्षेत्रात ९४ टक्के पाणीसाठा उपलब्ध, रानीवली धरण क्षेत्रात ५८ टक्के पाणीसाठा उपलब्ध, म्हसळा तालुक्यातील पाभरे धरण क्षेत्रात ९९ टक्के पाणीसाठा उपलब्ध, संदेरी धरण क्षेत्रात ९२ टक्के पाणीसाठा उपलब्ध, महाड तालुक्यातील वरंध धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध, खिंडवाडी धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध, कोथुर्डे धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध, खैरे धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध, कर्जत तालुक्यातील साळोख धरण क्षेत्रात ८९ टक्के पाणीसाठा उपलब्ध, अवसरे धरण क्षेत्रात ८९ टक्के पाणीसाठा उपलब्ध, खालापूर तालुक्यातील भिलवले धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध, कलोते मोकाशी धरण क्षेत्रात ९४ टक्के पाणीसाठा उपलब्ध, डोणवत धरण क्षेत्रात ७९ टक्के पाणीसाठा उपलब्ध, पनवेल तालुक्यातील मोरबे धरण क्षेत्रात ९६ टक्के पाणीसाठा उपलब्ध, बामणोली धरण क्षेत्रात ९१ टक्के पाणीसाठा उपलब्ध,उसरण धरण क्षेत्रात ९१ टक्के पाणीसाठा उपलब्ध, उरण तालुक्यातील पुनाडे धरण क्षेत्रात ६० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
हेही वाचलंत का?
Kajol Deepfake Video : रश्मिका अन् कटरिना नंतर आता काजोलचा ‘डीपफेक’ व्हायरल
Maratha Reservation : भुजबळ सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करताहेत : संभाजीराजे छत्रपती
The post रायगड जिल्ह्यातील २८ धरणात सरासरी ८८.३५ पाणीसाठा उपलब्ध appeared first on पुढारी.
रायगड, पुढारी वृत्तसेवा : रायगड जिल्ह्यात २८ धरणात सरासरी ८८.३५ पाणीसाठा उपलब्ध असून हा पाणीसाठा गेल्या वर्षापेक्षा मात्र दोन टक्क्याने कमी असल्याचे दिसून येते. गेल्या वर्षी याच तारखेला २०२२ मध्ये सरासरी ९०.७८ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. २०२२ मध्ये सरासरी ९०.७८ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. रायगड जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने जिल्ह्यातील रायगड पाटबंधारे विभाग कोलाड …
The post रायगड जिल्ह्यातील २८ धरणात सरासरी ८८.३५ पाणीसाठा उपलब्ध appeared first on पुढारी.