पुणे : अतिक्रमणांना प्रशासनाचे अभय : फेरीवाले, पथारी व्यावसायिकांची दहशत

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरातील विविध रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे थाटण्यात आली असून, वारंवार तक्रारी करूनही या अतिक्रमणांवर कारवाई केली जात नाही. रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणार्‍यांकडून चिरीमिरी घेऊन प्रशासनाकडून अभय दिले जात आहे. तर, दुसरीकडे नव्याने भरती करण्यात आलेले कर्मचारी राजकीय व्यक्ती व व्यावसायिकांच्या भीतीपोटी अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे अधिकारी सांगत आहेत. शहरातील फेरीवाल्यांना … The post पुणे : अतिक्रमणांना प्रशासनाचे अभय : फेरीवाले, पथारी व्यावसायिकांची दहशत appeared first on पुढारी.

पुणे : अतिक्रमणांना प्रशासनाचे अभय : फेरीवाले, पथारी व्यावसायिकांची दहशत

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : शहरातील विविध रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे थाटण्यात आली असून, वारंवार तक्रारी करूनही या अतिक्रमणांवर कारवाई केली जात नाही. रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणार्‍यांकडून चिरीमिरी घेऊन प्रशासनाकडून अभय दिले जात आहे. तर, दुसरीकडे नव्याने भरती करण्यात आलेले कर्मचारी राजकीय व्यक्ती व व्यावसायिकांच्या भीतीपोटी अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे अधिकारी सांगत आहेत.
शहरातील फेरीवाल्यांना आणि पथारी व्यावसायिकांना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून वार्षिक शुल्क घेऊन फेरीवाला प्रमाणपत्र दिले जाते. ज्याच्या नावावर प्रमाणपत्र आहे, त्या व्यक्तीने किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीने व्यवसाय करणे बंधनकारक आहे. पोटभाडेकरू ठेवल्याचे आढळल्यास अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जाते. फेरीवाला प्रमाणपत्रातील अटी-शर्तींचा भंग केल्यास प्रथम वेळेस एक हजार रुपये दंड, तर दुसर्‍या वेळेस 5 हजार दंड आणि त्यानंतर फेरीवाला प्रमाणपत्र रद्द करण्याची कारवाई केली जाते. मात्र, नोंदणीकृत आणि परवानाधारक फेरीवाल्यांकडून आणि पथारी व्यावसायिकांकडून सर्रासपणे परवाने व दुकाने भाड्याने दिली जातात.
अशा प्रकारे 70 टक्के व्यावसायिकांनी प्रमाणपत्रातील अटी व शर्तींचा भंग केला आहे. दुसरीकडे शहरातील लहान-मोठ्या रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात अनधिकृत व्यावसायिकांनी अतिक्रमणे थाटली आहेत. शहरातील बहुतांश रस्त्यांच्या कडेला व पदपथांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे दिसतात. दुपारच्यानंतर या अतिक्रमणांमध्ये मोठ्या प्रमाणात भर पडते. पदपथ असतानाही फळे व विविध वस्तूंची विक्री करणारे टेम्पो रस्त्याच्याकडेला उभे केले जातात.
यामुळे रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा होऊन वाहतूक कोंडी होते. हे चित्र शहरातील बहुतांश भागात दिवस असताना कारवाई करण्याची जबाबदारी असणारे अधिकारी मात्र, अशा अनधिकृत व्यावसायिकांना अर्थपूर्ण सहकार्य करतात. वरिष्ठांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतरही कारवाई करणे टाळून विविध कारणे पुढे केली जातात. अशा अनधिकृत व्यावसायिकांकडून अतिक्रमण निरीक्षक हप्ते घेऊन दुर्लक्ष करतात, त्यामुळे अनधिकृत व्यावसायिकांची व अतिक्रमणांची संख्या वाढत असल्याचे अधिकृत व प्रमाणपत्रधारक व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
नवीन कर्मचारी कारवाईला घाबरतात
अतिक्रमण विभागात नव्याने अतिक्रमण निरीक्षकांची पदे भरली आहेत, तरीही शहरातील रस्त्यांवर अतिक्रमणे वाढल्याचे चित्र आहे. याबाबात अतिक्रमण विभागाच्या अधिकार्‍यांकडे विचारणा केल्यानंतर नवीन कर्मचारी व अतिक्रमण निरीक्षक कारवाई करण्यास घाबरत असल्याचे उत्तर देण्यात आले. याचे प्रमुख कारण पथारी व्यावसायिकांचा विरोध आणि त्यांना मिळणारे राजकीय पाठबळ असल्याचेही सांगण्यात आले.
उड्डाणपुलाचे काम सुरू आहे, तरीही अतिक्रमण जोमात
सिंहगड रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या कामामुळे वाहतूक कोंडी होत असतानाही संपूर्ण सिंहगड रस्त्यावर पदपथ सोडून दररोज विविध विक्रेते मुख्य रस्त्यावरच वेगवेगळ्या वस्तू, फळभाज्या यांची विक्री करतात. या ठिकाणी वाहनचालक रस्त्यालाच वाहने उभी करून खरेदी करतात. त्यामुळे सायंकाळी या रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. तरीही याकडे अतिक्रमण विभागाचे लक्ष नाही.
कारवाईला टाळाटाळ करणार्‍या पाच निरीक्षकांना नोटिसा
अतिक्रमण विभागाकडून नेमण्यात आलेल्या निरीक्षकांनी कारवाईचा अहवाल देणे आवश्यक आहे. काही निरीक्षकांकडून कारवाई करण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्यामुळे पाच निरीक्षकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर याची नोंद सेवापुस्तकात करण्यात येणार आहे. त्यामुळे कारवाई न करणार्‍या अतिक्रमण निरीक्षकांना तंबी देण्यात आली आहे.
हेही वाचा

कोल्हापूर : शहापूर येथे शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू
निवडणुकांच्या रणधुमाळीत मतदारांची सत्त्वपरीक्षा
वडणगेतील प्रेरणला बॅडमिंटनमध्ये सुवर्ण पदक

Latest Marathi News पुणे : अतिक्रमणांना प्रशासनाचे अभय : फेरीवाले, पथारी व्यावसायिकांची दहशत Brought to You By : Bharat Live News Media.