पुणे : जिल्ह्यात 1192 विकास संस्था संगणकीकरणासाठी पात्र

पुणे : पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या पुढाकाराने विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या संगणकीकरण योजनेत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी (पीडीसीसी) संलग्न असलेल्या 1 हजार 192 विकास सोसायट्या पात्र ठरल्या आहेत. याकामी सहकार विभागाने पुढाकार घेतला असून निवड झालेल्या विकास सोसायट्यांचे संगणकीकरण लवकरच पूर्ण होत असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी दिली. … The post पुणे : जिल्ह्यात 1192 विकास संस्था संगणकीकरणासाठी पात्र appeared first on पुढारी.

पुणे : जिल्ह्यात 1192 विकास संस्था संगणकीकरणासाठी पात्र

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या पुढाकाराने विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या संगणकीकरण योजनेत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी (पीडीसीसी) संलग्न असलेल्या 1 हजार 192 विकास सोसायट्या पात्र ठरल्या आहेत. याकामी सहकार विभागाने पुढाकार घेतला असून निवड झालेल्या विकास सोसायट्यांचे संगणकीकरण लवकरच पूर्ण होत असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी दिली. जिल्ह्यात विकास सोसायट्याभावी व त्यांच्या कामकाजाची गतिमानता वाढविण्यासाठी, तत्काळ विविध सेवा उपलब्ध होण्यासाठी संगणकीकरण महत्त्वपूर्ण आहे. त्याकरिता खेड, शिरूर, दौंड आणि इंदापूर या चार तालुक्यांमध्ये संगणकीकरण
समूह (क्लस्टर्स) स्थापन केले आहेत.
या क्लस्टर्समधील 555 विकास संस्थांचे संगणकीकरण करण्याकरिता आवश्यक ते कामकाज राज्याच्या सहकार विभागाकडून सुरू आहे. त्यामुळे सोसायट्यांचे संगणकीकरण लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.
इंदापूरमधील सर्वाधिक सोसायट्या
जिल्हा बँकेच्या संगणकीकरणासाठी पात्र ठरलेल्या तालुकानिहाय विकास सोसायट्यांमध्ये सर्वाधिक 201 सोसायट्या या इंदापूर तालुक्यातील आहेत. आंबेगाव 58, बारामती 178, भोर 53, दौंड 123, हवेली 96, जुन्नर 74, खेड 103, मावळ 31, मुळशी 46, पुरंदर 95, शिरूर 127 आणि वेल्हे 6 मिळून 1 हजार 192 सोसायट्यांचा समावेश आहे. जिल्हा बँकेशी संबंधित एकूण 1 हजार 326 सोसायट्या असल्याची माहिती बँकेच्या प्रशासन विभागाकडून मिळाली.
हेही वाचा

Bharat Live News Media’चा उद्या वर्धापन दिन
वडणगेतील प्रेरणला बॅडमिंटनमध्ये सुवर्ण पदक
Nagar : प्रशासक होताच आयुक्त अ‍ॅक्शन मोडवर

Latest Marathi News पुणे : जिल्ह्यात 1192 विकास संस्था संगणकीकरणासाठी पात्र Brought to You By : Bharat Live News Media.