धुळे: महिलेसोबतचे फोटो व्हायरलची धमकी, व्यापाऱ्याकडे मागितली १० लाखांची खंडणी

धुळे, पुढारी वृत्तसेवा: धुळे शहरातील चक्करबर्डी परिसरात बॉडी मसाजच्या नावाने बोलवून महिलेसोबत बळजबरीने अश्लील फोटो काढून खंडणी मागण्यात आली, अशी तक्रार एका भंगार व्यापाऱ्याने दिली आहे. त्यानुसार धुळे शहर पोलीस ठाण्यात ६ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात दोन महिलांचा देखील समावेश आहे. साक्री रोडवरील मोगलाई मधील आयशा मशीदजवळ राहणारे भंगार व्यावसायिक अब्दुल हाफीज … The post धुळे: महिलेसोबतचे फोटो व्हायरलची धमकी, व्यापाऱ्याकडे मागितली १० लाखांची खंडणी appeared first on पुढारी.

धुळे: महिलेसोबतचे फोटो व्हायरलची धमकी, व्यापाऱ्याकडे मागितली १० लाखांची खंडणी

धुळे, Bharat Live News Media वृत्तसेवा: धुळे शहरातील चक्करबर्डी परिसरात बॉडी मसाजच्या नावाने बोलवून महिलेसोबत बळजबरीने अश्लील फोटो काढून खंडणी मागण्यात आली, अशी तक्रार एका भंगार व्यापाऱ्याने दिली आहे. त्यानुसार धुळे शहर पोलीस ठाण्यात ६ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात दोन महिलांचा देखील समावेश आहे.
साक्री रोडवरील मोगलाई मधील आयशा मशीदजवळ राहणारे भंगार व्यावसायिक अब्दुल हाफीज मोईद शेख (वय ५६) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. बॉडी मसाजचे कारण सांगून त्यांना चक्करबर्डी येथील एका घरात नेले. या ठिकाणी सुनिल नावाच्या व्यक्ती व अन्य दोन जणांनी मारहाण केली. यानंतर एका महिलेसोबत फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी देत १० लाखांची खंडणी मागितली. यानंतर शेख याचा परिचीत जावेद नकटया याला बोलविण्यात आले. तडजोडी केल्यानंतर तीन लाख रुपये देण्याचे ठरले.
परंतु, जावेद याने शेख याच्या वतीने अज्ञात व्यक्तींना ३ लाख दिल्याचे भासविले. त्यानंतर जावेद याने ३ लाखांसाठी अब्दुल शेख याला वारंवार फोन करुन ३ लाख लवकर दे. अन्यथा फोटो व्हायरल करायला लावेल. अशी धमकी दिली. अब्दुल शेख याच्या तक्रारीवरुन जावेद नकटया, दोन महिला, सुनिल तसेच दोन अनोळखी विरोधात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा 

धुळे | महसुल वसुलीचे उद्दीष्ट वेळेत पूर्ण करावे : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे
धुळे : जिल्हा रुग्णालयातील अति दक्षता, बाल अतिदक्षता विभाग युनिटचे उद्घाटन 
खासदारांचे निलंबन केल्याने केंद्र सरकारचा धुळे जिल्हा काँग्रेसतर्फे निषेध

Latest Marathi News धुळे: महिलेसोबतचे फोटो व्हायरलची धमकी, व्यापाऱ्याकडे मागितली १० लाखांची खंडणी Brought to You By : Bharat Live News Media.