केंद्राने आरक्षणाची मर्यादा वाढवावी; मराठा, जाट, गुजर नेत्यांची मागणी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये आज (दि. ३०) जाट, गुजर आणि मराठा नेत्यांची आरक्षणासंदर्भात संयुक्त बैठक झाली. ‘केंद्र सरकारने आरक्षणाची मर्यादा वाढवावी’, असा सुर उपस्थित सर्वच नेत्यांकडून या बैठकीत व्यक्त करण्यात आला. या बैठकीला अखिल भारतीय मराठा महासंघ, अखिल भारतीय जाट महासभा, अखिल भारतीय गुजर महासभा या संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. या … The post केंद्राने आरक्षणाची मर्यादा वाढवावी; मराठा, जाट, गुजर नेत्यांची मागणी appeared first on पुढारी.

केंद्राने आरक्षणाची मर्यादा वाढवावी; मराठा, जाट, गुजर नेत्यांची मागणी

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये आज (दि. ३०) जाट, गुजर आणि मराठा नेत्यांची आरक्षणासंदर्भात संयुक्त बैठक झाली. ‘केंद्र सरकारने आरक्षणाची मर्यादा वाढवावी’, असा सुर उपस्थित सर्वच नेत्यांकडून या बैठकीत व्यक्त करण्यात आला. या बैठकीला अखिल भारतीय मराठा महासंघ, अखिल भारतीय जाट महासभा, अखिल भारतीय गुजर महासभा या संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. या सर्व संघटनांची १३ जानेवारीला पुन्हा एक बैठक दिल्ली येथे होणार आहे. Reservation
मराठा समाज, जाट समाज आणि गुजर समाजाची एक संयुक्त समिती लवकरच जाहीर करण्यात येईल, असे या सभेचे समन्वयक कामगार नेते राजेश निंबाळकर यांनी सांगितले. सविस्तर चर्चेसाठी १३ जानेवारीला पुन्हा दिल्ली येथे सर्व नेत्यांची एक बैठक होणार आहे. आरक्षणाची मर्यादा केंद्र सरकारने ताबडतोब वाढवावी, या प्रमुख मागणीसाठी या बैठकीत देशभरातील जाट, मराठा, गुजर समाजातील नेते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती मराठा महासंघाचे संभाजी दहातोंडे यानी दिली. Reservation
या बैठकीला अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप, सचिव संभाजी दहातोंडे, उपाध्यक्ष संतोष नानवटे, गजेंद्र भोंसले, दिलीप धन्दरे, शाम पवार, मयूर गुजर तर अखिल भारतीय जाट महासभेचे महासचिव युद्धवीर सिंह, भारतीय किसान यूनियनचे राकेशसिंह टिकैत, अखिल भारतीय गुजर महासभेचे सुभाष गुजर, परविंदर अवाना आदी नेतेमंडळी उपस्थित होते.
हेही वाचा 

Maratha Reservation Protest | आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही, २० जानेवारीला मुंबईकडे चला-मनोज जरांगे-पाटील
Maratha Reservation : मराठा समाजाचे सर्वेक्षण आठवडाभरात सुरू होणार
Maratha Reservation | मोठा दिलासा! मराठा आरक्षणाबाबतची क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने स्वीकारली

Latest Marathi News केंद्राने आरक्षणाची मर्यादा वाढवावी; मराठा, जाट, गुजर नेत्यांची मागणी Brought to You By : Bharat Live News Media.