मुस्लिम महिलांना भाजपकडे आकर्षिक करण्यासाठी भाजपची नवी कँपेन

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय जनता पक्षाच्या वतीने मुस्लिम महिलांना पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी “शुक्रिया मोदी भाईजान” नवी कँपेन लाँच केली जाणार आहे. पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने ही मोहीम सुरू केली जात आहे. उत्तर प्रदेशातील प्रत्येक मतदार संघात 1 हजार मुस्लिम महिलांना पक्षासोबत जोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. (Shukriya Modi Bhaijaan) ही मोहीम २ जानेवारीला सुरू … The post मुस्लिम महिलांना भाजपकडे आकर्षिक करण्यासाठी भाजपची नवी कँपेन appeared first on पुढारी.

मुस्लिम महिलांना भाजपकडे आकर्षिक करण्यासाठी भाजपची नवी कँपेन

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : भारतीय जनता पक्षाच्या वतीने मुस्लिम महिलांना पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी “शुक्रिया मोदी भाईजान” नवी कँपेन लाँच केली जाणार आहे. पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने ही मोहीम सुरू केली जात आहे. उत्तर प्रदेशातील प्रत्येक मतदार संघात 1 हजार मुस्लिम महिलांना पक्षासोबत जोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. (Shukriya Modi Bhaijaan)
ही मोहीम २ जानेवारीला सुरू होईल आणि ती पूर्ण एक महिना चालेल. उत्तर प्रदेश भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कुंवर बासित अली यांनी ही माहिती दिली आहे. ‘ना दुरी है, ना खाई है मोदी हमारा भाई है’ या टॅग लाईनने ही कँपेन चालवली जाणार आहे. (Shukriya Modi Bhaijaan)
केंद्र सरकारने राबवलेले विविध उपक्रम मुस्लिम महिलांपर्यंत पोहोचवले जाणार आहेत, त्यातून महिलांना भाजपला मतदान करण्यासाठी प्रेरित केले जाणार आहे. याशिवाय उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्यमान भारत योजना अशा विविध योजनांचा लाभ मुस्लिम महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठीही पक्षातर्फे प्रयत्न केले जातील. प्रत्येक लोकसभा मतदार संघात ही मोहीम राबवली जाईल, असे डेक्कन हेराल्डच्या बातमीत म्हटले आहे.

The #BJP‘s minority front will launch a ”Shukriya Modi Bhaijaan” campaign next week in all Lok Sabha constituencies of #UttarPradesh to draw #Muslim women towards the party ahead of the 2024 general elections.
Read more at: https://t.co/y4vRew6X6k
— Deccan Herald (@DeccanHerald) December 30, 2023

अली म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विविध कल्याणकारी योजना राबवताना महिलांना केंद्रस्थानी ठेवले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि महिलांचे नाते हे भावाबहिणीचे बनले आहे. त्यामुळे ‘शुक्रिया मोदी भाईजान’ असे या मोहिमेलान नाव दिले आहे.”
हेही वाचा

पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘अबूधाबी’मधील हिंदू मंदिराच्या उद्घाटनासाठी आमंत्रण
PM Modi Ayodhya Visit | अमृत भारतसह ६ वंदे भारत रेल्वेंना पीएम मोदींनी दाखवला हिरवा झेंडा
BJP On Thackeray: मोदी सरकारनं काय केलंय? ठाकरेंच्या ट्विटला भाजपचे उत्तर, म्हणाले…

Latest Marathi News मुस्लिम महिलांना भाजपकडे आकर्षिक करण्यासाठी भाजपची नवी कँपेन Brought to You By : Bharat Live News Media.