Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अयोध्येमध्ये सोमवारी २२ जानेवारीला रामलल्ला प्रतिष्ठापणा सोहळा पार पडत आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी आहेत. दरम्यान, परदेशातील आणखी एका हिंदू मंदिराच्या उद्धाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आले आहे, असे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. (BAPS Hindu Mandir)
संयुक्त अरब अमिरातीमधील अबुधाबी येथे आणखी एका हिंदू मंदिराचे बांधकाम सुरू आहे. पंतप्रधान मोदी यांना १४ फेब्रुवारी २०२४ रोजी होणाऱ्या अबुधाबी येथील BAPS हिंदू मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण आले असून, त्यांनी ते स्वीकारले आहे, असे बोचासनवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेने सांगितल्याचे देखील वृत्तात म्हटले आहे. (BAPS Hindu Mandir)
#WATCH | UAE: Drone visuals of the construction work of BAPS Hindu temple that is underway in Abu Dhabi
“PM Narendra Modi accepted the invitation to inaugurate the BAPS Hindu Mandir in Abu Dhabi on February 14, 2024”, said BAPS Hindu Mandir in Abu Dhabi yesterday pic.twitter.com/xDEF1abdwu
— ANI (@ANI) December 29, 2023
अबुधाबीतील BAPS हिंदू मंदिराची वैशिष्टये
अबुधाबीमध्ये बांधण्यात येत असलेल्या BAPS हिंदू मंदिर बांधकामासाठी सुमारे 700 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हे मंदिर वैदिक वास्तुकला आणि शिल्पकलेपासून प्रेरित गुलाबी वाळूचा दगड आणि संगमरवरी वापरण्यात आला आहे. मंदिरातील उत्कृष्ट कोरीवकाम आणि शिल्पे भारतातील कारागिरांच्या मदतीने तयार केली गेली आहेत. यूएईमधील BAPS हिंदू मंदिर हे स्थापत्य कौशल्याचे उत्तम उदाहरण आहे. हे मंदिर कारागिरांनी इतक्या मजबूतपणे बांधले आहे की 1000 वर्षे त्याला काहीही होणार नाही. BAPS मंदिराच्या रचनेत सात शिखरे अधोरेखित करण्यात येणार आहेत. त्या प्रत्येकावर UAE चे चिन्ह असेल. मंदिर संकुलात मुलांसाठी वर्गखोल्या, प्रदर्शन केंद्र आणि खेळाचे मैदानही आहे.
हेही वाचा:
PM Modi Ayodhya Visit : अयोध्या संपूर्ण उत्तर प्रदेशच्या विकासाला दिशा देईल : पंतप्रधान नरेंद्र माेदी
Rohini Khadse On Sheetal Mhatre | “तुमची लायकी नाही…”; रोहिणी खडसेंनी म्हात्रेंना सुनावले
BJP On Thackeray: मोदी सरकारनं काय केलंय? ठाकरेंच्या ट्विटला भाजपचे उत्तर, म्हणाले…
The post PM मोदींना ‘अबूधाबी’मधील हिंदू मंदिराच्या उद्घाटनासाठी आमंत्रण appeared first on Bharat Live News Media.