आमदार राजळेंकडून लोकशाहीची हत्या : अ‍ॅड. प्रताप ढाकणे

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा :  आमदार मोनिका राजळे यांनी आपले पाप धुण्यासाठी खरेदी-विक्री संघाच्या साडेपाच हजार सभासदांपैकी अनेक सभासदांना वगळून, केवळ मर्जीतील बाराशे सभासद ठेवले. मोठ्या राजकीय दबावातून संघाची निवडणूक अचानक जाहीर करून, सभासदांची फसवणूक केली आहे. ही लोकशाहीची हत्या असून, या निवडणुकीत सहभाग घेणे म्हणजे त्यांच्या पापात सहभागी होण्यासारखे असल्याने, निवडणुकीवर आम्ही बहिष्कार … The post आमदार राजळेंकडून लोकशाहीची हत्या : अ‍ॅड. प्रताप ढाकणे appeared first on पुढारी.

आमदार राजळेंकडून लोकशाहीची हत्या : अ‍ॅड. प्रताप ढाकणे

पाथर्डी तालुका : Bharat Live News Media वृत्तसेवा :  आमदार मोनिका राजळे यांनी आपले पाप धुण्यासाठी खरेदी-विक्री संघाच्या साडेपाच हजार सभासदांपैकी अनेक सभासदांना वगळून, केवळ मर्जीतील बाराशे सभासद ठेवले. मोठ्या राजकीय दबावातून संघाची निवडणूक अचानक जाहीर करून, सभासदांची फसवणूक केली आहे. ही लोकशाहीची हत्या असून, या निवडणुकीत सहभाग घेणे म्हणजे त्यांच्या पापात सहभागी होण्यासारखे असल्याने, निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकणार आहोत, असे राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनी म्हटले आहे.
ढाकणे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, संघाच्या मालकीचे एकेकाळी कापड दुकान, खते व बी बियाणे, अवजारे विक्रीची दुकाने होती. मात्र, संघाची सत्ता राजळे यांच्या ताब्यात आल्यानंतर ही सर्व दुकाने बंद पडली. सध्या साधे रॉकेल देखील शेतकर्‍यांना मिळत नाही.
संघाचे सभासद कमी करताना कोणतीही कायदेशीर प्रक्रिया राबविली नाही. मृत सभासदांची नावे कमी करताना त्यांच्या वारसांना कोणत्याही प्रकारच्या नोटिसा बजावल्या नाहीत. वार्षिक सर्वसाधारण सभेत या विषयावर कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. या विषयावर आम्ही सहकार खात्याकडे अनेक वेळा तक्रारी केल्या.
मात्र, राजकीय दबाव आणून या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आले. संघाच्या मालकीचा असलेलया पेट्रोल पंपावर काय कारभार चालतो, हे संपूर्ण तालुका जाणतो. मापात पाप करणे, वाढीव दराने इंधन विकणे, असे उद्योग पेट्रोल पंपावर चालतात. संघाच्या मालकीच्या बांधण्यात येत असलेल्या नवीन इमारतीचे काम नियमबाह्य आहे. त्यासाठी घेतलेले कर्ज सुद्धा बेकायदेशीर आहे, अशी टीका ढाकणे यांनी केली आहे.
न्यायालयात जाणार : अ‍ॅड. ढाकणे
कोणत्या कारणामुळे खरेदी-विक्री संघाचे सभासद कमी केले, याची कल्पना त्यांना दिली नाही. त्यामुळे पुढील काळात कमी करण्यात आलेल्या सभासदांना, परत सभासद करून घेण्यासाठी न्यायालयात जाणार असल्याचे अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :

Health Insurance | सेवानिवृत्ती नियोजनात आरोग्य विमा इतका महत्त्वाचा का आहे?
सुनील केदार यांना दिलासा नाही; जामीन अर्ज फेटाळला

Latest Marathi News आमदार राजळेंकडून लोकशाहीची हत्या : अ‍ॅड. प्रताप ढाकणे Brought to You By : Bharat Live News Media.