पुंछमध्ये प्रवेश नाकारला, मेहबूबा मुफ्तींचे धरणे आंदोलन
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांना प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव पुंछमध्ये आज (दि.३०) प्रवेश नाकारला. या निषेधार्थ त्यांनी समर्थकांसह राजौरी-पुंछ महामार्गावर धरणे आंदोलन केले.
21 डिसेंबर रोजी दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केला. यामध्ये चार जवान शहीद झाले होते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी लष्कराने काही स्थानिकांना ताब्यात घेतले. यामधील तिघांचा लष्कराच्या कोठडीत मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.
लष्कराच्या कोठडीत मृत्यू झाल्याचा आरोप करणार्या नागरिकांची भेट घेण्यासाठी मेहबूबा मुफ्ती पुंछमध्ये जात होत्या. पोलीस अधिकार्यांनी मुफ्तींना पुंछमध्ये प्रवेश नाकारला. या निषेधार्थ त्यांनी राजौरी-पुंछ महामार्गावर धरणे आंदोलन केले. महामार्गावरुन हटणार नाही, अशी भूमिका त्यंनी घेतली. तसेच प्रशासन दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी माध्यमांशी बोलतान मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या की, प्रशासन मला इतके का घाबरते आहे हे मला कळत नाही. कोणतीही सुरक्षा समस्या नाहीत, तरीही मला परवानगी नाही. वाहतूक सुरू आहे, नेते नातेवाईकांना भेटत आहेत, फक्त मला थांबवले जात आहे.
#WATCH | Poonch, J&K: PDP Chief Mehbooba Mufti was stopped by Police at DKG road for security reasons. https://t.co/3g8XoXE6br pic.twitter.com/OcwjEXxgQd
— ANI (@ANI) December 30, 2023
The post पुंछमध्ये प्रवेश नाकारला, मेहबूबा मुफ्तींचे धरणे आंदोलन appeared first on Bharat Live News Media.