Pune : थंडीमुळे गहू, हरभरा जोमदार

बारामती : पुढारी वृत्तसेवा : अवकाळी पावसाचे संकट, वारंवार तयार होत असलेले ढगाळ वातावरण, पिकांवर वाढलेली रोगराई याला तोंड देत बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकर्‍यांनी चालू वर्षी गहू व हरभरा या रब्बी हंगामातील पिके घेतली आहेत. अनेक संकटाचा सामना करत उपलब्ध पाण्यावर गहू आणि हरभरा जोमदार वाढू लागला आहे. चालू वर्षी बारामती तालुक्यात सरासरीपेक्षा कमी … The post Pune : थंडीमुळे गहू, हरभरा जोमदार appeared first on पुढारी.

Pune : थंडीमुळे गहू, हरभरा जोमदार

बारामती : Bharat Live News Media वृत्तसेवा : अवकाळी पावसाचे संकट, वारंवार तयार होत असलेले ढगाळ वातावरण, पिकांवर वाढलेली रोगराई याला तोंड देत बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकर्‍यांनी चालू वर्षी गहू व हरभरा या रब्बी हंगामातील पिके घेतली आहेत. अनेक संकटाचा सामना करत उपलब्ध पाण्यावर गहू आणि हरभरा जोमदार वाढू लागला आहे. चालू वर्षी बारामती तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. त्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईचा विचार करता शेतकर्‍यांनी कमी प्रमाणात गहू आणि हरभर्‍याचे पीक घेतले, तर काही शेतकर्‍यांनी उसाच्या शेतात हरभरा करत आंतरपिकाला प्राधान्य दिले आहे.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला ऊस गाळपासाठी गेल्याने मोकळ्या झालेल्या शेतात गहू व हरभर्‍याची पिके शेतकर्‍यांनी घेतली आहेत. ठोस उत्पन्न देणारे उसाचे पीक म्हणून हा भाग ओळखला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उसाची शेती असल्याने गेल्या काही वर्षांत गहू आणि हरभरा या पिकांमध्ये घट झाल्याचे चित्र आहे. घरातील कुटुंबापुरते धान्य पिकविण्याकडे कल वाढत असल्याने गहू आणि हरभरा या रब्बी हंगामातील पिकांमध्ये घट होताना दिसत आहे. पश्चिम भागात पाण्याची मुबलक उपलब्धता असल्याने शेतकरी शेतात वेगवेगळे प्रयोग राबवत आहेत. सोमेश्वरनगर, चौधरवाडी, करंजे, निंबुत, मुरुम, वाणेवाडी, वाघळवाडी, होळ आदी परिसरात गहू आणि हरभरा पिके बहरली असून, गेल्या आठवड्यापासून वाढलेल्या थंडीचा फायदा या पिकांना होत आहे.
गहू आणि हरभरा धान्याचे दर वाढले असून, शेतकर्‍यांना पिकातून चांगले उत्पन्न मिळण्याची आशा आहे. हवामान बदलाचा परिणाम या पिकांवर जाणवत असून खते, औषधे यांचा वापर करून शेतकरी पिकांची काळजी घेताना दिसत आहेत. यांत्रिकीकरणामुळे गहू काढणे सोपे झाल्याने मजुरांचा प्रश्न शेतकर्‍यांना सतावत नाही. वीजपुरवठा सुरळीत असल्याने शेतकर्‍यांना शेताला पाणी देण्यास सध्या तरी अडचण जाणवत नाही. बारामती, लोणंद, फलटण आदी बाजारपेठा जवळ असल्याने शेतमाल विकण्यास शेतकर्‍यांना सोपे जात आहे.
Latest Marathi News Pune : थंडीमुळे गहू, हरभरा जोमदार Brought to You By : Bharat Live News Media.