ठाणे : बॉम्ब ठेवल्याचा ‘तो’ इमेल युरोपमधून आल्याचे उघड

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : ठाण्यातील सिव्हल हॉस्पिटलजवळ असलेल्या ज्यू धार्मियांच्या प्रार्थनास्थळावर बॉम्ब ठेवल्याचा इमेल प्राप्त झाल्याने गुरुवारी शहरात मोठी खळबळ उडाली होती. पोलीस तपासातून हा मेल युरोपमधून आल्याचे समोर आले आहे. ठाण्यातील 147 वर्ष जुन्या ज्यू धर्माच्या शार हशमैम – गेट ऑफ हेवन या संस्थेच्या इमेलवर बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली होती. या घटनेनंतर पोलीस … The post ठाणे : बॉम्ब ठेवल्याचा ‘तो’ इमेल युरोपमधून आल्याचे उघड appeared first on पुढारी.
ठाणे : बॉम्ब ठेवल्याचा ‘तो’ इमेल युरोपमधून आल्याचे उघड

ठाणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : ठाण्यातील सिव्हल हॉस्पिटलजवळ असलेल्या ज्यू धार्मियांच्या प्रार्थनास्थळावर बॉम्ब ठेवल्याचा इमेल प्राप्त झाल्याने गुरुवारी शहरात मोठी खळबळ उडाली होती. पोलीस तपासातून हा मेल युरोपमधून आल्याचे समोर आले आहे.
ठाण्यातील 147 वर्ष जुन्या ज्यू धर्माच्या शार हशमैम – गेट ऑफ हेवन या संस्थेच्या इमेलवर बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली होती. या घटनेनंतर पोलीस प्रशासन अलर्ट झाल्यानंतर घटनास्थळी बॉम्ब शोध पथकासह, स्थानिक पोलीस, गुन्हे शाखेचे पथक असा पोलीस फौजफाटा तपास कामी लावण्यात आला. मात्र, पोलीस तपासानंतर ही धमकी फक्त अफवा असल्याचे समोर आले होते.
दरम्यान, नौपाडा पोलीस, क्राईम युनिट आणि सायबर सेलचे पोलीस पथक या घटनेचा तपास करीत असून पोलीस तपासातून हा मेल युरोपमधून आल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्या मेल आयडी वरून हा धमकीचा इमेल पाठवण्यात आला होता. त्या इमेलचा आयपी अड्रेस युरोपमधील आहे, असे सायबर सेलच्या तपासातून समोर आले आहे. ठाणे पोलिसांच्या सायबर सेलने आता त्या ईमेलच्या डोमेनला पत्र लिहून पिन पॉइंट लोकेशन आणि त्या आयपी अड्रेसची संपूर्ण माहिती मागवली आहे. त्यानुसार पुढील तपास केला जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
हेही वाचा 

Thane crime news : कल्याण येथील लॉजमध्ये आढळला महिलेचा मृतदेह
Thane News: भूमाफियांकडून वास्तुविशारद संदीप पाटील यांच्या जीवाला धोका; अज्ञातांकडून घरावर पाळत
Thane News : पाचपाखाडी येथील इमारतीत अग्नितांडव; १३ दुचाकी, ३ चारचाकी जळून खाक

Latest Marathi News ठाणे : बॉम्ब ठेवल्याचा ‘तो’ इमेल युरोपमधून आल्याचे उघड Brought to You By : Bharat Live News Media.