Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : संपूर्ण जग २२ जानेवारीच्या ऐतिहासिक क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे. आज केवळ रामलल्लालाच पक्के घर मिळालेले नाही तर देशातील ४ कोटी गरीब जनतेलाही पक्के घर मिळाले आहे. आजचा भारत आपल्या तीर्थक्षेत्रांचे सुशोभीकरण करत आहे आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या जगातही मग्न आहे. अयोध्या संपूर्ण उत्तर प्रदेशच्या विकासाला दिशा देईल, असे प्रतिपादन असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. अयोध्येत विकास कामांच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशाच्या इतिहासात ३० डिसेंबर ही तारीख अत्यंत ऐतिहासिक ठरली आहे. 1943 मध्ये या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमानमध्ये ध्वज फडकावला आणि भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. आज, स्वातंत्र्य चळवळीशी निगडित अशा एका शुभदिनी आपण स्वातंत्र्याच्या अमर युगाचा संकल्प पुढे नेत आहोत. आज विकसित भारताच्या उभारणीला गती देण्याच्या मोहिमेला अयोध्या शहरातून नवी ऊर्जा मिळत आहे. आज येथे 15 हजार कोटींहून अधिक रकमेच्या विकासकामांची पायाभरणी व उद्घाटन करण्यात आले. पायाभूत सुविधांशी संबंधित या कामांमुळे पुन्हा एकदा आधुनिक अयोध्या देशाच्या नकाशावर अभिमानाने प्रस्थापित होईल. जगात कोणताही देश असो, त्याला विकासाची नवी उंची गाठायची असेल तर त्याचा वारसा जपलाच पाहिजे. आपला वारसा आपल्याला प्रेरणा देतो, आपल्याला योग्य मार्ग दाखवतो. त्यामुळे आजचा भारत जुना आणि नवा या दोन्ही गोष्टी आत्मसात करून पुढे जात आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
Latest Marathi News ‘रामलल्लाला नाही तर देशातील ४ कोटी गरीबांनाही घर मिळाले’ Brought to You By : Bharat Live News Media.
‘रामलल्लाला नाही तर देशातील ४ कोटी गरीबांनाही घर मिळाले’