अल्पवयीन गर्भवती असल्याचं लपवलं, प्रसूतीनंतर फुटले बिंग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीची माहिती आदिवासी विकास विभागाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा व्यवस्थापनाने दडवून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या मुलीची जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर बिंग फुटले. दरम्यान, या प्रकरणाविषयी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने आदिवासी विकासमंत्री, प्रधान मुख्य सचिव आणि आदिवासी आयुक्तांकडे तक्रार केली असून, विशेष तपास पथक (एसआयटी) नेमून … The post अल्पवयीन गर्भवती असल्याचं लपवलं, प्रसूतीनंतर फुटले बिंग appeared first on पुढारी.

अल्पवयीन गर्भवती असल्याचं लपवलं, प्रसूतीनंतर फुटले बिंग

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा- गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीची माहिती आदिवासी विकास विभागाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा व्यवस्थापनाने दडवून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या मुलीची जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर बिंग फुटले. दरम्यान, या प्रकरणाविषयी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने आदिवासी विकासमंत्री, प्रधान मुख्य सचिव आणि आदिवासी आयुक्तांकडे तक्रार केली असून, विशेष तपास पथक (एसआयटी) नेमून सखोल चौकशीची मागणी केली आहे.
आदिवासी विकास विभागाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येते. नववीत शिकणारी विद्यार्थिनी गर्भवती राहिली. परंतु, शाळेने ही बाब आयुक्तालयापासूनदेखील लपवून ठेवली. या मुलीची गेल्या १८ डिसेंबरला शासकीय जिल्हा रुग्णालयात प्रसूतीदेखील केली गेली. तेव्हा हा प्रकार उघड झाला. त्यानंतर आदिवासी विकास परिषदेने शालेय व्यवस्थापनावर बोट ठेवत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. आदिवासी विकास विभागाच्या शाळांमध्ये विद्यार्थिनींची नियमित वैद्यकीय तपासणी होत असते. शिवाय विद्यार्थिनींचे मासिक पाळी रजिस्टरही अद्ययावत ठेवले जाते. त्यानंतरही ही बाब लपून कशी राहिली की ती दडविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न झालेत, असा सवाल उपस्थित केला जात आहे. तेव्हा या शाळेतील विद्यार्थिनींची गेल्या वर्षभरात कुणी तपासणी केली, कुणी – कुणी शाळेला भेटी दिल्या, याची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष गणेश गवळी यांनी केली आहे.
हेही वाचा :

BJP On Thackeray: मोदी सरकारनं काय केलंय? ठाकरेंच्या ट्विटला भाजपचे उत्तर, म्हणाले…
शरद पवार 12 तारखेला जुन्नरचा तिढा सोडविणार
गडचिरोली : पती, मुलगा आणि सुनेदेखत रानटी हत्तीने घेतला महिलेचा जीव

Latest Marathi News अल्पवयीन गर्भवती असल्याचं लपवलं, प्रसूतीनंतर फुटले बिंग Brought to You By : Bharat Live News Media.