हिना खाननंतर शिझान खान रुग्णालयात दाखल, फोटो केला शेअर
छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवणारी अभिनेत्री हिना खानवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Hina And Sheezan Khan) तिची प्रकृती खालावल्यानंतर आता शीझान खानदेखील रुग्णालयात दाखल झाला आहे. दोघांनी रुग्णालयातून फोटो शेअर केले आहेत. हिनाने रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. (Hina And Sheezan Khan)
संबंधित बातम्या –
Thalapathy Vijay : विजयकांत यांच्या अंत्यदर्शनावेळी थलापती विजयवर फेकली चप्पल (Video)
‘सूर नवा ध्यास नवा- आवाज तरुणाईचा’ शो चा आज ग्रँड फिनाले
Flash Back 2023 मध्ये इन्स्टाग्रामवर व्हायरल झाली ‘ही’ 5 बॉलीवूड गाणी
तसेच तिच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. हिना खानवर गेल्या चार दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हिनाला ताप आल्यानं तिला दवाखान्या अॅडमिट करावं लागलं. तिने बेडचा एक फोटो शेअर केलाय. त्यामध्ये ती बेडवर बसलेली दिसते. शिवाय, आणखी एका फोटोत तिने १०२ डिग्री टेम्परेचर दाखवत असलेले थर्मामीटर दाखवले आहे.
हिना खानने लिहिलं आहे की,”तापामुळे गेल्या चार रात्री माझ्यासाठी खूपच त्रासदायक होत्या. मी चार रात्र अजिबात झोपली नाही. १०२-१०३ डिग्री ताप आहे. अशक्तपणा खूप आला आहे. माझे फॅन्स चिंता व्यक्त करत आहेत. पण लवकरच माझ्या प्रकृतीत सुधारणा होईल. तुमचं प्रेम असंच राहू द्या”.
शीजान खान देखील रुग्णालयात दाखल
टीव्ही अभिनेता शीजान खानची प्रकृती खालावल्यानंतर तो रुग्णालयात दाखल झाला. त्याने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती फॅन्सना दिलीय. तसेच त्याने म्हटलंय की, या वर्षातील ही वेळ त्याला अजिबात चांली नाही.
View this post on Instagram
A post shared by Sheezan M Khan BABA (@sheezan9)
View this post on Instagram
A post shared by Sheezan M Khan BABA (@sheezan9)
Latest Marathi News हिना खाननंतर शिझान खान रुग्णालयात दाखल, फोटो केला शेअर Brought to You By : Bharat Live News Media.