मोदी सरकारनं काय केलंय? ठाकरेंच्या ट्विटला भाजपचे उत्तर, म्हणाले…
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: उद्धव ठाकरे यांनी १० वर्षात मोदी सरकारने काय केलंय? असा प्रश्न आज (दि.३०) पत्रकार परिषदेदरम्यान उपस्थित केला. ठाकरेंच्या या प्रश्नाला भाजपने उत्तर दिले आहे, या संदर्भातील पोस्ट भाजपने त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून (सध्याचे ‘X’) केली आहे. (BJP On Thackeray)
भाजपने पोस्टमध्ये म्हटले आहे की, गेल्या १० वर्षात झालेले बदल पहायचे असतील तर आधी घरातून बाहेर पडावं लागेल. पण चिंता करू नका घर बसल्याही तुम्हाला बदल पहायला मिळतीलच. कारण “मोदी है तो सब मुमकीन है…” असेही भाजपने उद्धव ठाकरे यांना सुनावले आहे. (BJP On Thackeray)
यासाठी उध्दव साहेब एक काम करा, बसल्या बसल्या मोबाईलवर नमो ॲप डाऊनलोड करा आणि गेल्या १० वर्षात काय बदल झाले ते एका क्लीकवर पहा. यासाठी तुम्ही देखील आत्ताच अॅप डाऊनलोड करा, असा सल्ला भाजपने उद्धव ठाकरे यांना दिला आहे. या पोस्टसोबत भाजपने ‘नमो ॲप’ डाऊनलोड लिंक देखील ठाकरेंना पाठवली आहे. (BJP On Thackeray
‘ @OfficeofUT गेल्या १० वर्षात झालेले बदल पहायचे असतील तर आधी घरातून बाहेर पडावं लागेल. पण चिंता करू नका घर बसल्याही तुम्हाला बदल पहायला मिळतीलच…
कारण “मोदी है तो सब मुमकीन है…” एक काम करा उध्दव साहेब बसल्या बसल्या मोबाईलवर नमो ॲप डाऊनलोड करा आणि गेल्या १० वर्षात काय बदल… https://t.co/7UjnqH8kHm
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) December 30, 2023
भाजपकडे पर्याय काय?- उद्धव ठाकरेंचा सवाल
देश वाचला पाहिजे, लोकशाही वाचली पाहिजे. ह्यासाठी सर्वजण एकत्र आले आहेत. कोणी कितीही वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला तरी फरक पडत नाही. INDIA आघाडीकडे पर्याय खुप आहेत, पण भाजपकडे पर्याय काय आहे? असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेदम्यान केला आहे.
हेही वाचा:
Maharishi Valmiki Airport Ayodhya Dham | PM मोदींच्या हस्ते अयोध्येत विमानतळाचे उद्घाटन
Vande Bharat Express : ‘वंदे भारत एक्स्प्रेस’समोर निदर्शने करणार; इम्तियाज जलीलसह एमआयएम कार्यकर्ते संतप्त
Maharishi Valmiki Airport Ayodhya Dham | PM मोदींच्या हस्ते अयोध्येत विमानतळाचे उद्घाटन
Latest Marathi News मोदी सरकारनं काय केलंय? ठाकरेंच्या ट्विटला भाजपचे उत्तर, म्हणाले… Brought to You By : Bharat Live News Media.