राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण आले नाही : उद्धव ठाकरे
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : माझ्याकडे राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण आले नाही. अयोध्येत मी कधीही जाईन, दर्शन घेईन. हा राजकीय इव्हेंट होऊन नये इतकीच इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. (उद्धव ठाकरे)
संबंधित बातम्या –
दहशतवादी हाफीज सईदवरुन पाकचे रडगाणे सुरुच, म्हणे “भारताबरोबर…,
हिंजवडीचे माजी सरपंच विशाल साखरेंना मारहाण : मयूर साखरेंसह आठ जणांवर गुन्हा
Ayodhya Ram Mandir Inauguration : राम मंदिराच्या उभारणीत मराठी अभियंत्याकडे मोठी जबाबदारी
ते म्हणाले, शिवसेनेनं पक्षनिधीतून मंदिरासाठी योगदान दिलं. फडणवीस वकील आहेत, त्यांनी लखनऊ केस पाहावी. फडणवीसांनी स्वत:च ढोंगाचा बुरखा समोर आणला. लाखो करोंडोंच्या लोकांनी मंदिरासाठी योगदान दिलंय. निमंत्रण येऊ दे, त्यात राजकारणाचा भाग नाही. सगळ मीच केलं असा आव आणू नये. अडवाणींनी रथयात्रा काढली म्हणून मंदिर होतंय.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुका ३० एप्रिलपर्यंत लागू शकतात. काँग्रेसशी जागा वाटपाची चर्चा दिल्लीत होईल. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत दिल्लीत बैठक होईल. त्यांच्याकडून विरोध नाही. माझ्याकडून आघाडीत बिघाडी होऊ देणार नाही. काँग्रेसकडून अद्याप कुठलाही फॉर्म्युला आलेला नाही. त्यांच्याशी चर्चा करुन निर्णय होईल. वंचितसोबत चर्चा सुरु आहे. एक-दोन दिवसांत निर्णय होईल.
Latest Marathi News राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण आले नाही : उद्धव ठाकरे Brought to You By : Bharat Live News Media.