Pimpri : संमेलनात नागरिकांचा सहभाग वाढवा : आयुक्तांच्या सूचना
पिंपरी : शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयातून काम करावे. आवश्यक त्या सोयी सुविधांची पूर्तता करावी. संमेलनात नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर भर द्यावा, अशा सूचना महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी विविध विभागांच्या अधिकार्यांना दिल्या.
शहरात होणार्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने पुरविण्यात येणार्या सोयी सुविधांबाबत आढावा बैठक महापालिका भवनात झाली. त्यावेळी आयुक्त सिंह बोलत होते. बैठकीस अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, शहर अभियंता मकरंद निकम, सहशहर अभियंता डॉ. ज्ञानदेव जुंधारे, बाबासाहेब गलबले, उपायुक्त मनोज लोणकर, मिनीनाथ दंडवते, नीलेश भदाणे, सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे, नाट्य परिषद संयोजन समितीचे सुहास जोशी, संतोष पाटील, प्रणव जोशी, राजेंद्र भंग, मनोज डाळींबकर आदी उपस्थित होते.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, महापालिका, पिंपरी-चिंचवड कलारंग प्रतिष्ठान आणि डॉ. पी. डी. पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने नाट्य संमेलन दि. 6 व 7 जानेवारी 2024 या कालावधीत पिंपरी-चिंचवड शहरात रंगणार आहे. या काळात महापालिकेच्या काही सभागृहांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत. संमेलनात उपस्थित रसिक तसेच, कलाकारांसाठी योग्य त्या सोयी सुविधांची उपलब्धता करून देण्यात येणार आहे. या संमेलनाचा उद्घाटन सोहळा ज्या ठिकाणी पार पडणार आहे त्या ठिकाणीदेखील आवश्यक सोयी सुविधा महापालिका पुरविणार आहे. या सर्व कामकाजाचा आढावा व नियोजनाबाबत आयुक्त सिंह यांनी माहिती घेतली.
नाट्य परिषदेच्या प्रतिनिधींनी कामकाजाबाबत रूपरेषा व माहिती दिली. महापालिकेकडून पुरविण्यात येणार्या सेवा व सुविधा उपलब्ध करून देत असताना नाट्य परिषदेचे प्रतिनिधी देखील कामकाजनिहाय संबंधित विभागांशी समन्वय ठेवतील, असे भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले.
हेही वाचा
जयस्तंभ मानवंदनेसाठी पीएमपीच्या जादा बस
Pimpri News : ‘आरटीओ’च्या वायुवेग पथकाची करवसुली मोहीम
Pune News : ससूनचे अधीक्षकपद बनले संगीतखुर्ची! दीड वर्षांत पाचजण
Latest Marathi News Pimpri : संमेलनात नागरिकांचा सहभाग वाढवा : आयुक्तांच्या सूचना Brought to You By : Bharat Live News Media.