पिंपरी : उद्योगनगरीत मराठी नाट्य संमेलनाची लगबग

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन 6 व 7 जानेवारी 2024 रोजी उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आयोजित करण्यात आले आहे. संमेलन चिंचवड येथील मोरया गोसावी क्रीडा संकुल येथे होणार आहे. या पार्श्वभूमीवर तयारीने वेग घेतल्याचे दिसते. अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या वाटचालीतील हे शतकी संमेलन असल्याने या संमेलनाला विशेष … The post पिंपरी : उद्योगनगरीत मराठी नाट्य संमेलनाची लगबग appeared first on पुढारी.

पिंपरी : उद्योगनगरीत मराठी नाट्य संमेलनाची लगबग

पिंपरी : Bharat Live News Media वृत्तसेवा : शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन 6 व 7 जानेवारी 2024 रोजी उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आयोजित करण्यात आले आहे. संमेलन चिंचवड येथील मोरया गोसावी क्रीडा संकुल येथे होणार आहे. या पार्श्वभूमीवर तयारीने वेग घेतल्याचे दिसते. अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या वाटचालीतील हे शतकी संमेलन असल्याने या संमेलनाला विशेष महत्त्व आहे. राज्यभरात या नाट्य संमेलनाचे कार्यक्रम घेतले जाणार आहेत.
आठवड्याभरावर येऊन ठेपलेल्या या नाट्य संमेलनाच्या मुख्य सभामंडपाचे काम मोरया गोसावी क्रीडा संकुलवर जोरदार सुरू आहे. मुख्य सभामंडपांतील काम 50 टक्के पूर्ण झाले असून, 1 जानेवारीपर्यंत संमेलन स्थळांवरील संपूर्ण काम पूर्ण होईल, असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे. तर मुख्य सभामंडप हा 60 बाय 80 फूट इतका मोठा बांधण्यात आला आहे. तसेच लहान मुलांच्या कार्यक्रमासाठी भव्य बालमंचदेखील उभारण्यात येत आहे.
तब्बल दोन दिवस उद्योग नगरीत रंगणार्या या 100 व्या अ . भा. म. नाट्य संमेलनासाठी आयोजक भाऊसाहेब भोईर म्हणाले, नाट्य संमेलनाच्या तयारीने आता वेग घेतला आहे. मुख्य सभामंडप आणि बालमंच या शिवाय पिंपरी – चिंचवड शहरातील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह (चिंचवड), निळू फुले नाट्यगृह (सांगवी), गदिमा नाट्यगृह (प्राधिकरण), अंकुशराव लांडगे नाट्यगृह (भोसरी) असे एकंदरीत सहा ठिकाणी 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनामध्ये रंगभूमीवर गाजलेली व्यावसायिक नाटके, बालनाट्य, उल्लेखनीय एकांकिका, प्रायोगिक नाटके, संगीत रजनी, संगीत नाटक यांसह 64 विविध सांस्कृतिक व नाट्यविषयक कार्यक्रम व नाटकांचे सादरीकरण होणार आहे.
हेही वाचा

जयस्तंभ मानवंदनेसाठी पीएमपीच्या जादा बस
काहीच न करता ‘हा’ माणूस कमावणार अब्जावधी रुपये
‘इथे’ सर्वप्रथम होणार नववर्षाचे स्वागत

Latest Marathi News पिंपरी : उद्योगनगरीत मराठी नाट्य संमेलनाची लगबग Brought to You By : Bharat Live News Media.