जयस्तंभ मानवंदनेसाठी पीएमपीच्या जादा बस
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : पीएमपीकडून दि. 31 डिसेंबर 2023 आणि दि. 1 जानेवारी 2024 रोजी मौजे पेरणे फाटा (भीमा कोरेगाव) येथे जयस्तंभास मानवंदना देण्याकरिता येणार्या अनुयांयीसाठी जादा बस गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुस्ती मैदान-लोणीकंद, खंडोबा माळ-लोणीकंद, सैनिकी शाळा, फुलगाव, तुळापूर रोड, चिंचवण हॉटेल/वाय जंक्शन, तुळापूर रोड येथून, तर शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीतील जीत पार्किंग,
वक्फ बोर्ड, जाधव पार्किंग, चाकण रोड, तोरणा हॉटेल, शिक्रापूर पार्किंग, वढू पार्किंग, इनामदार हॉस्पिटल या ठिकाणाहून भीमा कोरेगाव विजयस्तंभापर्यंत मोफत बससेवा पीएमपीएमएलकडून देण्यात येणार आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातून इतर मार्गांच्या बसने अनुयायींना पार्किंगपर्यंत तिकीट घेऊन प्रवास करावा लागणार आहे, असे पीएमपीकडून सांगण्यात आले आहे.
गडचिरोली : पती, मुलगा आणि सुनेदेखत रानटी हत्तीने घेतला महिलेचा जीव
Pimpri News : ‘आरटीओ’च्या वायुवेग पथकाची करवसुली मोहीम
काहीच न करता ‘हा’ माणूस कमावणार अब्जावधी रुपये
Latest Marathi News जयस्तंभ मानवंदनेसाठी पीएमपीच्या जादा बस Brought to You By : Bharat Live News Media.