Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (दि.३०) आयोध्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान अयोध्येत दाखल होताच, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर पीएम मोदींचे आयोध्येत आगमन होताच, फुलांच्या पाकळ्याचा वर्षाव करत येथील लोकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी पीएम मोदी यांनी देखील ताफ्यातील गाडीतून हात उंचावत, नमस्कार करत लोकांनी प्रतिसाद देत जोरदार रोड शो केला आहे. (PM Modi In Ayodhya)
पीएम मोदी यांच्या हस्ते आज अनेक प्रकल्पांचे लोकार्पण होणार आहे. यामध्ये महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम, पुनर्विकसित अयोध्या धाम रेल्वे स्टेशनचे उद्घाटन पीएम मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तसेच येथील नवीन अमृत भारत ट्रेन आणि वंदे भारत ट्रेनला देखील पीएम मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. (PM Modi In Ayodhya)
अयोध्येत २२ जानेवारीच्या रामल्ला प्रतिष्ठापना सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे असणारच आहेत. पण त्या आधी आज त्यांनी अयोध्यावासीयांना विविध विकासकामांच्या उद्घाटनांची भेट दिली. अयोध्याधाम रेल्वे स्थानकाचे उद्घाटन त्यांनी केले. सहा नवीन वंदे भारत रेल्वे गाड्या आणि दोन अमृत भारत रेल्वे गाड्यांचे लोकार्पण त्यांनी केले. त्यांनंतर त्यांनी महर्षी वाल्मिकी विमानतळाचे उद्घाटन केले. भारतीय मंदिर वास्तुकलेसारखी रचना असलेल्या या विमानतळाच्या पहिल्या टप्प्यातील टर्मिनल भवनचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. या विमानतळावर अहमदाबाद ते अयोध्या आणि दिल्ली ते अयोध्या या इंडिगोच्या विमानसेवेला प्रारंभ होणार आहे.
Prime Minister Narendra Modi arrives in Ayodhya; received by Uttar Pradesh Governor Anandiben Patel and CM Yogi Adityanath
PM Modi will inaugurate the Maharishi Valmiki International Airport Ayodhya Dham, redeveloped Ayodhya Dham Railway Station, and flag off new Amrit Bharat… pic.twitter.com/yWqDDowRcm
— ANI (@ANI) December 30, 2023
#WATCH | Prime Minister Narendra Modi receives a warm welcome as he arrives in Ayodhya, Uttar Pradesh pic.twitter.com/HG7L9Zxudd
— ANI (@ANI) December 30, 2023
#WATCH | People shower flower petals on Prime Minister Narendra Modi as he holds a roadshow in Ayodhya, Uttar Pradesh
PM Modi will inaugurate the Maharishi Valmiki International Airport Ayodhya Dham, redeveloped Ayodhya Dham Railway Station, and flag off new Amrit Bharat… pic.twitter.com/b53mxsHFml
— ANI (@ANI) December 30, 2023
Latest Marathi News अयोध्येत नमो नमो… ! पीएम मोदींचे जंगी स्वागत, ८ किमी लांब ‘रोड शो’ Brought to You By : Bharat Live News Media.