“अबब! केवढी ही गर्दी !”; भाजपकडून सुप्रिया सुळेंची खिल्ली

पुढारी ऑनलाईन डेस्क: खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा शेतकरी जनआक्रोश मोर्चा सुरू आहे. काल (दि.२९) बारामती येथील मोर्चाला खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. दरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांवरून भाजपने खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील मोर्चाची खिल्ली उडवली आहे. (BJP On Supriya Sule) महाराष्ट्र भाजपने त्यांच्या अधिकृत X अकाऊंटवरून राष्ट्रवादीच्या जनआक्रोश मोर्चाचा अक … The post “अबब! केवढी ही गर्दी !”; भाजपकडून सुप्रिया सुळेंची खिल्ली appeared first on पुढारी.
“अबब! केवढी ही गर्दी !”; भाजपकडून सुप्रिया सुळेंची खिल्ली

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा शेतकरी जनआक्रोश मोर्चा सुरू आहे. काल (दि.२९) बारामती येथील मोर्चाला खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. दरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांवरून भाजपने खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील मोर्चाची खिल्ली उडवली आहे. (BJP On Supriya Sule)
महाराष्ट्र भाजपने त्यांच्या अधिकृत X अकाऊंटवरून राष्ट्रवादीच्या जनआक्रोश मोर्चाचा अक फोटो शेअर केला आहे. दरम्यान या फोटोमध्ये खूपच तुटपुंजे लोक दिसत आहेत. यावरून भाजपने म्हटले आहे की, “अबब! केवढी ही गर्दी! याच विराट गर्दीला बघून, 10 महिने मतदारसंघ न सोडण्याची उपरती सुप्रियाताईना सुचली असेल.” असे म्हणत कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील मोर्चाची खिल्ली भाजपने उडवली आहे. (BJP On Supriya Sule)
BJP On Supriya Sule: “तुम्ही दिल्लीला जा…” सुळेंचा मुख्यमंत्र्यांना सल्ला
राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित शेतकरी आक्रोश मोर्चाचा काल (दि.२९) तिसरा दिवस होता. या मोर्चाची सांगता बारामती येथे मशाल मोर्चाने खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी “तुम्ही जसे पालकमंत्री बदलण्यासाठी दिल्लीला जाता, तसे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि आरक्षणाचा प्रश्न मिटवण्यासाठी तुम्ही दिल्लीला जा” असा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला.

अबब! केवढी ही गर्दी!
याच विराट गर्दीला बघून, 10 महिने मतदारसंघ न सोडण्याची उपरती सुप्रियाताईना सुचली असेल.@supriya_sule pic.twitter.com/eb5KZWlOew
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) December 30, 2023

हेही वाचा:

आपले खासदार होणार चारशे चार : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
Supriya Sule: “तुम्ही दिल्लीला जा…” खासदार सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांना विनंती
बळीराजा मुदत कर्ज योजना; जिल्हा बँकेकडून शेतकर्‍यांना थेट कर्जपुरठा

 
Latest Marathi News “अबब! केवढी ही गर्दी !”; भाजपकडून सुप्रिया सुळेंची खिल्ली Brought to You By : Bharat Live News Media.