श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर परिसरातील वाहतुक बदल; असा असेल बदल
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : नूतन वर्षानिमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात होणारी गर्दी पाहता वाहतुकीत 1 जानेवारी रोजी पहाटे पाच वाजल्यापासून गर्दी संपेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
बंद मार्ग : शिवाजी रोडने स्वारगेटकडे जाण्यासाठी मार्ग बंद करण्यात येणार आहे. त्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून चालकांनी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने झाशी राणी चौकातून डावीकडे वळून इच्छित ठिकाणी जावे. अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाण्याचा मार्ग बंद करण्यात आला असून, वाहन चालकांनी बाजीराव रोडने सरळ इच्छितस्थळी जावे.
शिवाजी रोडने जिजामाता चौकातून गणेश रोडने दारूवाला पुलाकडे जाण्यासाठी बंद करण्यात येणार आहे. तर वाहनचालकांनी गाडगीळ पुतळा येथून डाव्या बाजुने कुंभारवेस चौक- पवळे चौक-जुनी साततोटी पोलिस चौकी मार्गे इच्छित स्थळी जावे. तर गणेश रोडने देवजीबाबा, जिजामाता चौकाकडे जाण्यासाठी बंद करण्यात येत आहे. वाहन चालकांनी अपोलो टॉकिज, नरपतगिरी चौक, दारूवाला पूल-दुधभट्टीमार्गे इच्छित स्थळी जावे, असे आवाहन वाहतूक पोलिस उपआयुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.
हेही वाचा
पुणेकरांनो लक्ष द्या ! पाणीपट्टी थकवल्यास दरमहा एक टक्का दंड
मागोवा 2023 : पुणेकरांना नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीची प्रतीक्षाच
वाहने अडविण्याचा प्रयत्न केला तर फडणवीसांच्या दारात बसू!
Latest Marathi News श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर परिसरातील वाहतुक बदल; असा असेल बदल Brought to You By : Bharat Live News Media.