पुढारी ऑनलाईन डेस्क : सासरा, जावई काढायचा प्रश्नच नाही. मराठ्यांच्या शेपट्यावर पाय ठेवल्यावर काय होतं ते पाहा. वयाचे भान ठेवून बोला, तुम्ही वयाने मोठे आहात. शांत न राहिल्यास तुमचाही बायोडेटाही आमच्याकडे असल्याची टीका मनोज जरांगे-पाटील यांनी मंत्री छगन भूजबळ यांच्यावर केली आहे. सांगली येथील मराठा आरक्षण सभेनंतर ते आज (दि.१७) माध्यमांशी बोलत होते.
पुढे जरांगे पाटील म्हणाले, लोकांचे पैसे खाता आणि पाच- पाच वर्षे जेलमध्ये जाऊन बसता. तुम्ही लोकांना फसवून जेलमध्ये जाता मग तुम्हाला कोण शेंदूर लावेल? अशा प्रश्न करत, आम्हाला ओबीसी प्रवर्गतून आरक्षण पाहिजेच. ते आम्ही मिळवणारच अशी ठाम भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केली.
तुम्ही काहीही बोला आमची पातळी आम्ही घसरु देणार नाही. तुमच्या शेपटावर पाय देत नाही. तुम्ही आमच्या पायावर पाय घालू नका. तुम्ही काहीही बोला पण आम्ही आमची पातळी घसरु देणार नाही. यांना महाराष्ट्र अशांत करायच आहे म्हणून ते लोकांच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांनी हे करू नये. यासाठी सरकारने त्यांच्यावर लक्ष ठेवावे, अशी सूचना सरकारला जरांगे यांनी केली आहे.
यांना सत्ताधाऱ्यांनी उभा केलं आहे. काल ओबीसींनी माझं जेसीबी लावून स्वागत केलं. त्यांना काय माहीत मी किती शिकलो. त्यांच वय झालं आहे. त्या पद्धतीने ते बोलत आहेत. आम्ही थांबणार नाही, घाबरणार नाही, असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी छगन भूजबळ यांना उत्तर देताना म्हटले आहे.
The post ‘लोकांचे पैसे खाऊन पाच- पाच वर्षे जेलमध्ये जाऊन बसता…’ appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : सासरा, जावई काढायचा प्रश्नच नाही. मराठ्यांच्या शेपट्यावर पाय ठेवल्यावर काय होतं ते पाहा. वयाचे भान ठेवून बोला, तुम्ही वयाने मोठे आहात. शांत न राहिल्यास तुमचाही बायोडेटाही आमच्याकडे असल्याची टीका मनोज जरांगे-पाटील यांनी मंत्री छगन भूजबळ यांच्यावर केली आहे. सांगली येथील मराठा आरक्षण सभेनंतर ते आज (दि.१७) माध्यमांशी बोलत होते. पुढे जरांगे …
The post ‘लोकांचे पैसे खाऊन पाच- पाच वर्षे जेलमध्ये जाऊन बसता…’ appeared first on पुढारी.