विमान ढगांमधून जात असताना दिसते ‘असे’ द़ृश्य
लंडन : विमानातून प्रवास करताना खिडकीच्या शेजारची सीट मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. याचे कारण खिडकीतून दिसणारं मनमोहक द़ृश्य पाहण्याचा मोह आवरत नसतो. आपण कितीही मोठे झालो तरी ही एक गोष्ट मात्र आपल्याला बालपणात घेऊन जाते. अनेकदा आपल्याला हे द़ृश्य पाहिल्यानंतर कॉकपिटमधून किती सुंदर दिसत असेल असंही वाटतं; पण प्रवाशांना तिथे प्रवेश निषिद्ध असल्याने आपण फक्त अंदाजच लावू शकतो. दरम्यान, सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ अगदी डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे.
एका वृत्तानुसार हा व्हिडीओ तुर्कियेमधील आहे. एका वैमानिकाने हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केला आहे. या व्हिडीओ करोडो व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडीओत विमान इंस्तबूल विमानतळावर लँडिंग करताना दिसत आहे. दरम्यान, विमान लँड होण्याआधी हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला आकाशात ढगांची सुंदर चादर पसरलेली दिसत आहे. रात्रीच्या वेळी हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे.
विमान ढगांमधून मार्ग काढत लँडिंग होण्यासाठी खालील बाजूला दिसत आहे. ढगांमधून खाली उतरल्यानंतर विमान डाव्या बाजूला वळण घेताच खाली शहर दिसत आहे. यानंतर विमान जेव्हा लँडिंगसाठी जातं, ते पाहताना काळजाचा ठोका चुकतो. एक्सवर ही पोस्ट शेअर करण्यात आली असून, ‘रात्री लँडिंग करताना कॉकपिटमधील पायलट व्ह्यू’ अशी कॅप्शन दिली आहे. एका यूजरने कमेंट करत लिहिलं आहे की, ‘अंगावर रोमांच उभे करणारी 32 सेकंद’.
Latest Marathi News विमान ढगांमधून जात असताना दिसते ‘असे’ द़ृश्य Brought to You By : Bharat Live News Media.