Pune Crime News : रेकी करून जबरी चोर्‍या करणार्‍या टोळीला बेड्या

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यात लॉज बुक करून चोरी, जबरी चोरी करण्यासाठी रेकी करणार्‍या व शहरातील ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळक्या लष्कर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून 1 लाखांची रोकड आणि दरोड्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. अरमान कमल खान (25, पश्चिम बंगाल), सुमीतकुमार ऊर्फ राहुलकुमार रामसिंग यादव (30, रा. कठियार, बिहार) आणि … The post Pune Crime News : रेकी करून जबरी चोर्‍या करणार्‍या टोळीला बेड्या appeared first on पुढारी.

Pune Crime News : रेकी करून जबरी चोर्‍या करणार्‍या टोळीला बेड्या

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : पुण्यात लॉज बुक करून चोरी, जबरी चोरी करण्यासाठी रेकी करणार्‍या व शहरातील ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळक्या लष्कर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून 1 लाखांची रोकड आणि दरोड्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. अरमान कमल खान (25, पश्चिम बंगाल), सुमीतकुमार ऊर्फ राहुलकुमार रामसिंग यादव (30, रा. कठियार, बिहार) आणि सोनुकुमार रामनाथ यादव (25, रा. बिहार) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.
लष्कर पोलिस ठाण्याचे पथकातील कर्मचारी यांना आरोपी विशप स्कूल समोरील मोकळ्या जागेत लपून बसले असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांची चाहूल लागताच पळून जात असताना तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या तपासात त्यांचा शहरातील ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याचा ते प्रयत्न करत होते. नुकताच लष्कर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या बॅग लिफ्टींग प्रकरणातही त्यांचाच सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपींवर लष्कर पोलिस ठाण्यात दोन तर बंडगार्डन पोलिस ठाण्यात एक जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे. पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दशरथ पाटील, गुन्हे निरीक्षक प्रियंका शेळके, सहायक निरीक्षक शितलकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेंद्र कांबळे, अंमलदार महेश कदम, विलास शिंदे, मंगेश बोर्‍हाडे, रमेश चौधर, सागर हराळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.
बिहार, प. बंगालमधील बॅग चोरीचे गुन्हे
आरोपी हे लॉजवर थांबून रात्रीच्यावेळी गर्दीच्या ठिकाणी रेकी करत. ज्या ठिकाणी गुन्हा करण्याचे निश्चित करायचे त्या ठिकाणी इतर राज्यातील नंबर प्लेट असलेल्या दुचाकी वापरून सर्व ठिकाणी ते फिरून माहिती घेत होते. तर सीसीटिव्हीत येणार नाहीत याची खात्री करून गुन्हा करत असल्याचेे निष्पन्न झाले आहे. आरोपींनी पश्चिम बंगाल आणि बिहार येथे रेल्वेतून बॅग चोरीचे गुन्हे केल्याचे तपासात सांगितले आहे.
हेही वाचा

पुणेकरांनो लक्ष द्या ! पाणीपट्टी थकवल्यास दरमहा एक टक्का दंड
मागोवा 2023 : पुणेकरांना नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीची प्रतीक्षाच
Raigad | ताम्हिणी घाटात ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात, २ ठार, ५५ जखमी

Latest Marathi News Pune Crime News : रेकी करून जबरी चोर्‍या करणार्‍या टोळीला बेड्या Brought to You By : Bharat Live News Media.