जळगाव : सावळ येथे ऑडिनन्स फॅक्टरीत 1 लाखाची चोरी

जळगाव- भुसावळ येथील ऑडीनन्स फॅक्टरीमध्ये पिनाका प्रॉडक्शन विभागातून 24 ते 26 डिसेंबरच्या दरम्यान एक लाख वीस हजार रुपये किमतीची केबल चोरट्याने चोरली. या प्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ शहरात असलेल्या ऑडिनन्स फॅक्टरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरक्षा व प्रतिबंध क्षेत्र आहे. या ठिकाणी चारही बाजूंनी खडा पहारा देण्यात येतो मात्र … The post जळगाव : सावळ येथे ऑडिनन्स फॅक्टरीत 1 लाखाची चोरी appeared first on पुढारी.

जळगाव : सावळ येथे ऑडिनन्स फॅक्टरीत 1 लाखाची चोरी

जळगाव- भुसावळ येथील ऑडीनन्स फॅक्टरीमध्ये पिनाका प्रॉडक्शन विभागातून 24 ते 26 डिसेंबरच्या दरम्यान एक लाख वीस हजार रुपये किमतीची केबल चोरट्याने चोरली. या प्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ शहरात असलेल्या ऑडिनन्स फॅक्टरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरक्षा व प्रतिबंध क्षेत्र आहे. या ठिकाणी चारही बाजूंनी खडा पहारा देण्यात येतो मात्र अशा ठिकाणीही व महत्त्वाच्या कारखान्यात चोरीचा प्रकार झाल्यामुळे ऑडिनन्स फॅक्टरीच्या सुरक्षा प्रश्नावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये पिनाका  प्रॉडक्शन विभागातून अज्ञात चोरट्याने एक लाख वीस हजार रुपये किमतीचे साहित्य लांबवले आहे.
ऑडिनन्स फॅक्टरी मध्ये दि. 23 ते 26 डिसेंबरच्या दरम्यान पिनाका प्रॉडक्शन केंद्राच्या खिडकीला लावलेल्या ग्रीलचे गज कापून अज्ञात चोरटा आत शिरला व आतील पिनाका प्रोडक्शन केंद्रात असलेल्या वेल्डिंग मशीनची 90 हजार रुपयाची वायर तसेच तीस हजार रुपयांचे किमतीचे वेल्डिंग मशीनचे दोन टॉर्च असा एकूण एक लाख वीस हजार रुपयांचे साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेले. याप्रकरणी ऑडिनन्स फॅक्टरी चे प्रदीप गोहीराम टेहलानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
हेही वाचा :

Millets : सरकारचे बाजरीसाठी कुठेपण, कधीपण, कायपण…
Agriculture Loan : विजयी घोडदौड बळीराजाची!
विद्यापीठांतील घटनात्मक पदभरतीचा अधिकार आता संबंधित विभागांकडे

Latest Marathi News जळगाव : सावळ येथे ऑडिनन्स फॅक्टरीत 1 लाखाची चोरी Brought to You By : Bharat Live News Media.