मागोवा 2023 : पुणेकरांना नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीची प्रतीक्षाच

पुणे : पाणी, कचरा, रस्ते, ड्रेनेज, अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामे यांसारख्या नागरी प्रश्नांपासून सरत्या वर्षात पुणेकरांना काही अंशी दिलासा मिळणे अपेक्षित होते. मात्र, सर्व समस्या ’जैसे थे’च असल्याने त्यांच्या पदरी निराशाच पाडली आहे. तर दुसरीकडे शहराच्या विकासाच्या काही प्रकल्पांची कामे सुरू आहेत, तर एचसीएमटीआर-सारखे प्रकल्प कागदावरच आहेत. काही प्रकल्प सुरू, तर काही कागदावरच स्थानिक स्वराज्य … The post मागोवा 2023 : पुणेकरांना नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीची प्रतीक्षाच appeared first on पुढारी.

मागोवा 2023 : पुणेकरांना नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीची प्रतीक्षाच

हिरा सरवदे

पुणे : पाणी, कचरा, रस्ते, ड्रेनेज, अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामे यांसारख्या नागरी प्रश्नांपासून सरत्या वर्षात पुणेकरांना काही अंशी दिलासा मिळणे अपेक्षित होते. मात्र, सर्व समस्या ’जैसे थे’च असल्याने त्यांच्या पदरी निराशाच पाडली आहे. तर दुसरीकडे शहराच्या विकासाच्या काही प्रकल्पांची कामे सुरू आहेत, तर एचसीएमटीआर-सारखे प्रकल्प कागदावरच आहेत.
काही प्रकल्प सुरू, तर काही कागदावरच
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्वाधिक मोठी आणि सक्षम संस्था म्हणून महापालिकांकडे पाहिले जाते. त्यामुळे शहरातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी तेथील महापालिकांकडून पायाभूत सेवासुविधांसह सुशोभीकरणाची जास्तीत जास्त कामे होण्याची अपेक्षा असते. अशीच काहीशी अपेक्षा दरवर्षी पुणेकर पुणे महापालिकेकडून ठेवतात. पुरेसे पाणी, रस्ते, कचर्‍याचा प्रश्न, वीज आणि अतिक्रमणमुक्त रस्ते मिळण्याची अपेक्षा उपनगरे व नव्याने समावेश झालेल्या गावांमधील नागरिकांनी होती.

शहराचा मध्यवर्ती भाग सोडला तर उपनगरांमध्ये अनियमित आणि अपुरा पाणीपुरवठा होतो. शहर, उपनगरे आणि समाविष्ट गावांमधील नागरिकांची तहान भागवण्यासाठी पाणी कोटा वाढवून घेण्याचे प्रयत्न महापालिका करत आहे. मात्र, मागील वर्षभरात या प्रयत्नांना यश आलेले नाही. शहरातील मूळ लोकसंख्या, नोकरी व विविध कामांनिमित्त शहरात येणारे नागरिक आणि समाविष्ट गावांमधील लोकसंख्या यांना पाणीपुरवठा करताना वर्षाच्या सुरुवातीला जी कसरत महापालिकेला करावी लागत होती, तीच कसरत आजही करावी लागते. भामा आसखेड योजना सुरू झाल्याने पूर्व भागातील नागरिकांना पाणीटंचाईमधून काहीसा दिलासा मिळाला आहे.
प्रभागात कचरा जिरवण्याचा संकल्प कागदावरच
शहरात दिवसाला जवळपास 2 हजार ते 2200 मे. टन कचरा निर्माण होतो. त्यात आता पालिका हद्दीत समावेश झालेल्या गावांमधील कचर्‍याचीही भर पडली आहे. हा सर्व कचरा संकलित करण्यासाठी महापालिकेने यंत्रणा निर्माण केली आहे. निर्माण होणारा कचरा जिरवण्यासाठी महापालिकेने शहरात ओल्या व सुक्या कचर्‍यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प आणि बायोगॅसचे प्रकल्प

समान पाणीपुरवठा कासवगतीने
शहरातील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने हाती घेतलेल्या समान पाणीपुरवठा योजनेचे काम हव्या त्या गतीने होत नाही. मार्च 2024 पर्यंत काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, आतापर्यंत केवळ 70 टक्के काम झाले आहे. यात जलवाहिन्यांचे काम 75.81 टक्के, पाणी मीटर बसविण्याचे काम 62.23 टक्के, तर 82 पाणी साठवण टाक्यांपैकी 48 टाक्यांची कामे झाली आहे.
एचसीएमटीआर प्रकल्प कागदावरच
शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी महापालिकेने एचसीएमटीआर प्रकल्पाचे नियोजन केले होते. मात्र, एचसीएमटीआरच्या नियोजित मार्गावरच पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला जोडणारी निओ मेट्रो करण्याचा मतप्रवाह राजकीय नेत्यांमधून आल्याने एचसीएमटीआर प्रकल्प कागदावरच राहिला. या वर्षभरात ना एचसीएमटीआर मार्गी लागला, ना निओ मेट्रोचा प्रस्ताव रुळावर आला.

हेही वाचा

वेल डन! कोयताधारी टोळक्याला पोलिस खाक्या दाखविणार्‍या ‘ती’चा सत्कार
वाहने अडविण्याचा प्रयत्न केला तर फडणवीसांच्या दारात बसू!
जालना- मुंबई वंदे भारत आजपासून धावणार

Latest Marathi News मागोवा 2023 : पुणेकरांना नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीची प्रतीक्षाच Brought to You By : Bharat Live News Media.