सरकारचे बाजरीसाठी कुठेपण, कधीपण, कायपण…

गहू, तांदूळ वगळता बाजरी, ज्वारी, नाचणी आदी पिकांकडे दिवसेंदिवस उत्पादक (शेतकरी) आणि ग्राहक अशा दोन्ही घटकांचे दुर्लक्ष होत चाललेले आहे. हे नव्या सरकारने हेरले. गव्हातील ग्लुटोन हा घटक आरोग्याच्या द़ृष्टिकोनातून संशयास्पद मानला जाऊ लागलेला असताना, बाजरीतील आरोग्यवर्धक गुण हायलाईट केले गेले. 2023 हे वर्ष भरड धान्यासाठी प्रोत्साहनपर ठरावे म्हणून भारताने युनोत प्रस्ताव ठेवला. अन्य 72 … The post सरकारचे बाजरीसाठी कुठेपण, कधीपण, कायपण… appeared first on पुढारी.

सरकारचे बाजरीसाठी कुठेपण, कधीपण, कायपण…

गहू, तांदूळ वगळता बाजरी, ज्वारी, नाचणी आदी पिकांकडे दिवसेंदिवस उत्पादक (शेतकरी) आणि ग्राहक अशा दोन्ही घटकांचे दुर्लक्ष होत चाललेले आहे. हे नव्या सरकारने हेरले. गव्हातील ग्लुटोन हा घटक आरोग्याच्या द़ृष्टिकोनातून संशयास्पद मानला जाऊ लागलेला असताना, बाजरीतील आरोग्यवर्धक गुण हायलाईट केले गेले. 2023 हे वर्ष भरड धान्यासाठी प्रोत्साहनपर ठरावे म्हणून भारताने युनोत प्रस्ताव ठेवला. अन्य 72 देशांचा त्याला पाठिंबा मिळाला. 2023 हे आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून जाहीर झाले. केंद्र सरकारने ज्वारी, बाजरी व तत्सम भरड धान्याला प्रोत्साहन दिले. शेतकरी आणि ग्राहक दोघेही ज्वारी, बाजरीकडे पूर्ववत वळायला लागले. राजस्थान, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा, गुजरात आणि मध्य प्रदेश या देशातील क्रमश: मोठ्या बाजरी उत्पादक राज्यांतून बाजरीच्या पेरणी क्षेत्रात आणखी वाढ त्यामुळे झाली. यू-ट्यूबवर बाजरीच्या रेसेपी झळकू लागल्या. बाजरीची भाकरी फुलवायची कशी, त्याच्या पाकतंत्राचे रिल व्हायरल होऊ लागले! दुकानांतून बाजरीचे पीठ मिळू लागले. अधनंमधनं का होईना ताटांत बाजरीची भाकरी दिसू लागली.
फायदे…

लठ्ठपणा कमी होतो.
मधुमेह, हायपर टेन्शन, हृदयविकाराचा धोका कमी होतो. बाजरीच्या नियमित सेवनाने ट्रायग्लिस्राईड्सचे प्रमाण कमी होते, हे हृदयविकाराचा धोका कमी होण्यामागचे कारण.
पोट आणि लिव्हरचे आजार रोखण्यात सक्षम
कुपोषणाविरुद्ध प्रभावी.

सरकारचे बाजरीसाठी कुठेपण, कधीपण, कायपण…
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्टार्टअप्ससाठी बाजरी आव्हान उपक्रमाची घोषणाही केली होती. तीन विजेत्यांना प्रत्येकी एक कोटी रुपयांचे बियाणे अनुदान देण्यात आले होते. हे तिघे संपूर्ण देशासाठी बाजरी उत्पादनाचे एक आदर्श पीकक्षेत्र आकारणार व विकसित करणार आहेत. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेच्या माध्यमातून रायचूर कृषी विद्यापीठाला बाजरी व्हॅल्यू चेन पार्कसाठी उष्मायन केंद्राकरिता (इन्क्युबेशन सेंटर) 25 कोटी रुपये अर्थसाहाय्यही जाहीर केलेले आहे.
Latest Marathi News सरकारचे बाजरीसाठी कुठेपण, कधीपण, कायपण… Brought to You By : Bharat Live News Media.