रायगड- ताम्हिणी घाटात ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात, २ ठार, ५५ जखमी

रायगड, पुढारी वृत्तसेवा : रायगड (Raigad)  जिल्ह्यातील माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताम्हिणी घाट परिसरात आज सकाळी ७.३० च्या सुमारास ट्रॅव्हल्स बस उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून ५५ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे, अशी माहिती रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. Maharashtra | Two … The post रायगड- ताम्हिणी घाटात ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात, २ ठार, ५५ जखमी appeared first on पुढारी.

रायगड- ताम्हिणी घाटात ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात, २ ठार, ५५ जखमी

रायगड, Bharat Live News Media वृत्तसेवा : रायगड (Raigad)  जिल्ह्यातील माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताम्हिणी घाट परिसरात आज सकाळी ७.३० च्या सुमारास ट्रॅव्हल्स बस उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून ५५ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे, अशी माहिती रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.

Maharashtra | Two people died and 55 got injured after a travel bus overturned in the Tamhani Ghat area of Raigad under the Mangaon police station area at around 7.30 am today. The injured were taken to the nearest hospital for treatment: SP Raigad, Somnath Gharge pic.twitter.com/zyXvMS4vAf
— ANI (@ANI) December 30, 2023

अधिक मिळालेल्या माहितीनुसार, माणगाव पोलीस ठाणे हद्दीत ताम्हिणी घाटात सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास ट्रॅव्हल्स क्रंमांक MH04 FK 6299 ही पुणे येथून माणगावकडे येत होती. यादरम्यान ती रस्त्याकडेला उतरल्याने पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात दोघा महिलांचा मृत्यू झाला. तसेच ५५ जण जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना माणगावातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या मार्गावर वाहतूक सुरळीत सुरु आहे.
रस्त्यावरील अवघड वळणावर वाहकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
Latest Marathi News रायगड- ताम्हिणी घाटात ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात, २ ठार, ५५ जखमी Brought to You By : Bharat Live News Media.