‘एमपीएससी’कडून 274 पदांसाठी भरती; 5 ते 25 जानेवारी या कालावधीत करा अर्ज

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात ‘एमपीएससी’तर्फे 27 एप्रिल रोजी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2024 घेण्यात येणार आहे. ही परीक्षा राज्यभरातील 37 जिल्हा केंद्रांवर घेतली जाणार असून, या परीक्षेसाठी 5 ते 25 जानेवारी या कालावधीत अर्ज करता येणार आहे.
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 च्या माध्यमातून विविध संवर्गांतील एकूण 274 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्या अंतर्गत सामान्य प्रशासन विभागातील राज्यसेवा संवर्गातील 205, मृद् आणि जलसंधारण विभागातील महाराष्ट्र स्थापत्य सेवा अभियांत्रिकी सेवा संवर्गातील 26, महसूल आणि वन विभागातील महाराष्ट्र वनसेवा संवर्गातील 43 पदांचा समावेश आहे. या पदांसाठी अर्ज करून ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्यासाठी 25 जानेवारी ही अंतिम मुदत आहे, तर 29 जानेवारीपर्यंत चलनाद्वारे शुल्क भरता येणार आहे.
पूर्वपरीक्षेतून पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी 14 ते 16 डिसेंबर या कालावधीत राज्य सेवा मुख्य परीक्षा 2024 ही 23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र स्थापत्य सेवा अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024, तर महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2024 ही 28 ते 31 डिसेंबर या कालावधीत होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. पदसंख्या आणि आरक्षणामध्ये बदल झाल्यास त्याचा समावेश मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेमध्ये करण्यात येईल. पूर्वपरीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत शासनाकडून सुधारित किंवा अतिरिक्त मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व पदे पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेतली जाणार असल्याची माहिती एमपीएससीने दिली.
हेही वाचा
Weather Update : आगामी आठवडा धुके अन् हलक्या पावसाचा
जरांगे मुंबईत येण्यापूर्वीच मराठा समाजाला आरक्षण : हसन मुश्रीफ
सी हेवी मोलॅसिसपासून तयार होणार्या इथेनॉल दरात 6.87 रु. वाढ
Latest Marathi News ‘एमपीएससी’कडून 274 पदांसाठी भरती; 5 ते 25 जानेवारी या कालावधीत करा अर्ज Brought to You By : Bharat Live News Media.
