Weather Update : आगामी आठवडा धुके अन् हलक्या पावसाचा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आगामी आठवड्यात राज्यात दाट धुके अन् हलका पाऊस असे वातावरण राहील. मात्र किमान तापमानात किंचित वाढ होऊन तापमान वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. उत्तर भारतात अनेक भागांत दाट धुके असून ते आगामी सात दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. वायव्य आणि मध्य भारतात 30 डिसेंबर ते 2 जानेवारी … The post Weather Update : आगामी आठवडा धुके अन् हलक्या पावसाचा appeared first on पुढारी.

Weather Update : आगामी आठवडा धुके अन् हलक्या पावसाचा

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : आगामी आठवड्यात राज्यात दाट धुके अन् हलका पाऊस असे वातावरण राहील. मात्र किमान तापमानात किंचित वाढ होऊन तापमान वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. उत्तर भारतात अनेक भागांत दाट धुके असून ते आगामी सात दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. वायव्य आणि मध्य भारतात 30 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात दाट धुके अन् हलक्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थानच्या बहुतांश भागांमध्ये किमान तापमान 7 ते 11 अंशांवर आहे.
द़ृश्यमानता खूप कमी झाली
जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा भागात 500 मीटर; तर दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार भागात
100 ते 250 मीटरपर्यंत दृश्यमानता कमी झाली आहे. मध्य प्रदेशात खजुराहोसारख्या भागात 500 मीटरपर्यंत दृश्यमानता कमी झाली आहे. त्यामुळे त्या भागात विमानांच्या उड्डाणांना विलंब होत आहे.
राज्याचे शुक्रवारचे किमान तापमान..
नगर 11.6, पुणे 13, कोल्हापूर 16.9, महाबळेश्वर 15.3, मालेगाव 15, नाशिक 14.4, सांगली 15.2, सोलापूर 16.2, धाराशिव 15.4, छत्रपती संभाजीनगर 13.5, परभणी 15.5, नांदेड 16.4, बीड 13.5, अकोला 15.6, चंद्रपूर 13.8, गोंदिया 13.5, नागपूर 14.9, वाशिम 14.2.
हेही वाचा

जरांगे मुंबईत येण्यापूर्वीच मराठा समाजाला आरक्षण : हसन मुश्रीफ
रत्नागिरी : गोळप येथे घरफोडी; तीन लाखाचा ऐवज लंपास
चंद्रपूर : मूल तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात शेतमजूर ठार

Latest Marathi News Weather Update : आगामी आठवडा धुके अन् हलक्या पावसाचा Brought to You By : Bharat Live News Media.