नौदलाच्या बॅजवरील शिवकालीन राजमुद्रेचे अनावरण

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक आरमाराच्या वारशापासून स्फूर्ती घेऊन भारतीय नौदल विभागाने अधिकार्यांसाठी बॅजचे डिझाईन बनवले आहे. यामध्ये शिवकालीन राजमुद्रेचे प्रतिबिंब पाहण्यास मिळणार आहे. नौदल विभागाने या राजमुद्रेचे शुक्रवारी अनावरण केले. या बॅजमधून भारताचा समृद्ध वारसा प्रतिबिंबित होतो.
नौदलदिनी घोषणा
ब्रिटिशकालीन बॅजची प्रथा बंद करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल दिनानिमित्त सिंधुदुर्ग या ठिकाणी घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे महत्त्व विशद करण्यासाठी नौदल अधिकार्यांच्या बॅजवर शिवाजी महाराजांच्या राजवटीतील राजमुद्रेचा समावेश करण्याची घोषणाही त्यांनी केली होती.
गोल्डन नेव्ही बटण
गोल्डन नेव्ही वसाहतकालीन बॅजचे नामोनिशाण मिटविण्यासाठी गोल्डन नेव्ही बटणचे डिझाईन बनवले आहे.
ऑक्टॅगन
अष्टभुजाकृती ऑक्टॅगनमधून नौदलाच्या दूरद़ृष्टीची, सामर्थ्याची आणि सर्वसमावेशकतेची प्रचिती येते.
स्वोर्ड
बॅजवरील स्वोर्ड अर्थात तलवारीचे चिन्ह पाहण्यास मिळणार आहे. नौदलाच्या पराक्रमाचे आणि शौर्याचे महत्त्व त्यातून अधोरेखित होते.
टेलिस्कोप नौदलाच्या दूरद़ृष्टीसह
जगभरातील हालचालींचा वेध घेण्याचे त्यांचे सामर्थ्य यातून प्रतिबिंबित होते.
Latest Marathi News नौदलाच्या बॅजवरील शिवकालीन राजमुद्रेचे अनावरण Brought to You By : Bharat Live News Media.
