रत्नागिरी : गोळप येथे घरफोडी; तीन लाखाचा ऐवज लंपास

रत्नागिरी; Bharat Live News Media वृत्तसेवा : तालुक्यातील गोळप येथील घराचा दरवाजा तोडून तब्बल ३ लाख ३७ हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला. याप्रकरणी राकेश रमेश बने (वय ४१) यांनी शुक्रवारी (दि.२९) पूर्णगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ही घटना २७ डिसेंबर ते २८ डिसेंबरच्या दरम्यान घडली.
राकेश बने हे आपल्या कुंटुंबासह २७ डिसेंबरला कोल्हापूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. २८ डिसेंबरला मध्यरात्री घरी परतल्यानंतर दरवाजाचे कुलुप तुटण्यात आल्याचे त्यांच्या नजरेस पडले. घरात जाऊन पाहिल्यानंतर कपाटातील सामान अस्ताव्यस्त स्वरूपात आढळून आले. कपाटातील सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा तब्बल ३ लाख ३७ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत बने यांनी शुक्रवारी (दि.२९) पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शशिकांत सावंत करत आहेत.
हेही वाचा :
अमरावती : कारागृहात दोन कैद्यांच्या गटात गँगवार; एका अधिकाऱ्यासह पाच जखमी
Amravati News : इर्विन चौकात युवकाचा चाकूने भोसकून खून, दोघांना अटक
Kolhapur News : भादवण येथे शरीर सुखाला नकार दिल्याने महिलेचा गळा आवळून खून
Latest Marathi News रत्नागिरी : गोळप येथे घरफोडी; तीन लाखाचा ऐवज लंपास Brought to You By : Bharat Live News Media.
