रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनचे १८ नागरिक ठार

पुढारी ऑनलाईन डेस्क : Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अधिकाधिक तीव्र होत आहे. शुक्रवारी रशियाने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनच्या १८ नागरिकांचा बळी गेला असून १३२ नागरिक जखमी आहेत. रशियाने युक्रेनची राजधानी किव, ओडेसा यांसह इतर काही शहरांवर हल्ले केले. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धातील रशियाच्या वतीने युक्रेनवर झालेला हा … The post रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनचे १८ नागरिक ठार appeared first on पुढारी.

रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनचे १८ नागरिक ठार

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अधिकाधिक तीव्र होत आहे. शुक्रवारी रशियाने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनच्या १८ नागरिकांचा बळी गेला असून १३२ नागरिक जखमी आहेत. रशियाने युक्रेनची राजधानी किव, ओडेसा यांसह इतर काही शहरांवर हल्ले केले. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धातील रशियाच्या वतीने युक्रेनवर झालेला हा सर्वांत मोठा हल्ला आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमर झेलेंस्की यांनी रशियाने ११० क्षेपणास्त्र डागल्याचे म्हटले आहे. हा हल्ला रहिवाशी इमारती, दवाखाने, व्यापारी संकुलं यावर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आज रशियाने त्यांच्याकडे असलेली सर्व प्रकारची शस्त्रं आमच्या विरोधात वापरली, असेही ते म्हणाले. (Russia Ukraine War)
ओडेसा आणि कीव येथील रहिवाशी इमारतींवर केलेल्या हल्ल्यात १८ नागरिकांचा बळी गेला आङे, तसेच निपोरो या शहरातील शॉपिंग सेंटर आणि एका हॉस्पिटलवरही हल्ला झाला.
युक्रेनच्या लष्कराने रशियाच्या लढाऊ जहाजावर हल्ला करून हे जहाज पूर्ण बेचिराख केले. ही घटना क्रिमिया येथील एका बंदरावर घडली. रशियानेही या हल्ल्यात लढाऊ जहाज नष्ट झाल्याची कबुली दिली. त्यानंतर बिथरलेल्या रशियाने आज युक्रेनमधील रहिवाशी इमारती, दवाखाने, शॉपिंग सेंटरवर हल्ले केले. (Russia Ukraine War)
Latest Marathi News रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनचे १८ नागरिक ठार Brought to You By : Bharat Live News Media.