नागपूर : ‘वेगळे विदर्भ राज्य निर्माण करा’; …अन्यथा आंदोलन तीव्र करू

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : वेगळ्या विदर्भ राज्यासाठी ३१ डिसेंबरपूर्वी केंद्र सरकारने निर्णय घ्यावा, या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने संविधान चौकात समितीचे नेते व माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरु आहे. आज या आंदोलनाचा तिसरा दिवस होता. सरकारने दखल न घेतल्यास हे आंदोलन अनिश्चित कालावधीपर्यंत रेटण्याचा निर्धार यावेळी सर्वच वक्त्यांनी … The post नागपूर : ‘वेगळे विदर्भ राज्य निर्माण करा’; …अन्यथा आंदोलन तीव्र करू appeared first on पुढारी.
नागपूर : ‘वेगळे विदर्भ राज्य निर्माण करा’; …अन्यथा आंदोलन तीव्र करू

नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : वेगळ्या विदर्भ राज्यासाठी ३१ डिसेंबरपूर्वी केंद्र सरकारने निर्णय घ्यावा, या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने संविधान चौकात समितीचे नेते व माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरु आहे. आज या आंदोलनाचा तिसरा दिवस होता. सरकारने दखल न घेतल्यास हे आंदोलन अनिश्चित कालावधीपर्यंत रेटण्याचा निर्धार यावेळी सर्वच वक्त्यांनी केला.
महिला आघाडीच्या नेत्या रंजना मामर्डे, पूर्व विदर्भ अध्यक्ष अरूण केदार, ज्योतीताई खांडेकर (नागपूर), उषाताई लांबट (नागपूर), विभागीय अध्यक्ष सुदाम राठोड (चंद्रपूर), निळकंठराव घवघवे, गणेश शर्मा-नागपूर, मोहम्मद आरिफ शेख (आर्वी), पंढरीनाथ घटे (राजुरा), बालाजी काकडे (वणी), विठ्ठलराव दोरखंडे (कोरपना), बबनराव ठाकरे (राळेगाव), दादाराव कोल्हे (तहशील), अरविंद राऊत (मोर्शी, अमरावती) यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
समितीचे जेष्ठ नेते आणि प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांच्या अध्यक्षतेखाली आमरण उपोषण सुरू आले. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार, शेतकरी नेते प्रकाश पोहरे, अहमद कादर (निमंत्रक विदर्भ जॉईन्ट अॅक्शन कमिटी), अॅड. निरज खांदेवाले आणि अॅड. एस.के. सन्याल (विदर्भ राज्य आघाडी), नितीन रोंघे-(संयोजक महाविदर्भ जनजागरण), विलास भोंगाडे (अध्यक्ष कष्टकरी जन आंदोलन), अण्णाजी राजेधर (महासचिव स्वातंत्र्य सेनानी संघटना), अॅड. अनिल काळे (संयोजक प्रजातांत्रिक लोकशाही मोर्चा), अविनाश काकडे (संघटक राष्ट्रवादी काँग्रेस), प्रा. राहुल मुन (संविधान परिवार नागपूर), रमेश पिसे (राष्ट्रीय समाज पक्ष), भाऊराव वानखेडे (रिपाई), अरूण वनकर (महाराष्ट्र किसान सभा राज्य सहसचिव), भारत राष्ट्र समितीचे बुलढाणा जिल्हा समन्वयक भैय्यासाहेब पाटील आंदोलनास समर्थन देण्यासाठी हजर होते.
हेही वाचा 

नागपूर : शिंदे गट १०० टक्के भाजपमध्ये विलीन होणार: विजय वडेट्टीवार
नागपूर : ट्रकने बहीण-भावाला चिरडले; जमावाने ट्रक पेटवून दिला
नागपूर : वंचित बहुजन आघाडीच्या सभेपूर्वी मंडपाचा अँगल कोसळला

Latest Marathi News नागपूर : ‘वेगळे विदर्भ राज्य निर्माण करा’; …अन्यथा आंदोलन तीव्र करू Brought to You By : Bharat Live News Media.